कुंभोज बाबूजमाल परिसरात गवारेड्याचे आगमन वन विभाग अधिकाऱ्यांची बाबुजमाल येथे भेट शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा.
कुंभोज बाबूजमाल परिसरात गवारेड्याचे आगमन वन विभाग अधिकाऱ्यांची बाबुजमाल येथे भेट शेतकऱ्यांना दक्षतेचा इशारा.
--------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
---------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथे बाबुजमाल डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात गवा रेड्याचे आगमन झाल्याचे दिलेने, आज सदर बाब्यमल परिसरातील शेती परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर नव्याने केलेले नुकसानीचे व ठशांची पाहणी केली असता सदर ठसे हे गवारेडेचे असल्याचे त्यांनी सांगितले तसेच परिसरातील सर्व शेतकरी वर्गाला दक्षतेचा इशारा देण्यात आला असून गवारेड्याच्या बंदोबस्त लवकरात लवकर केला जाईल अशी आश्वासन ही उपस्थित असणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. सदर गवारेडे यांनी परिसरात असणाऱ्या शाळू पिकाची मोठे नुकसान केले आहे.सदर परिसरातील प्रवीण सपकाळ यांच्या दोन एकर शाळुपिका मध्ये गवारेढ्यानी मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून, गवारेड्यांच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात सध्या भीतीची वातावरण पसरले आहे. परिणामी वन विभागाने सदर गवारेडे यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत होती .परिसरातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा वन विभागाचे वतीने देण्यात आला आहे.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment