मुरगुड मध्ये पोहण्याचा तलाव झाला पाहिजे.नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेस निवेदन.
मुरगुड मध्ये पोहण्याचा तलाव झाला पाहिजे.नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेस निवेदन.
---------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------------
मुरगूड शहराची लोकसंख्या वाढत आहे. नदी काठावरच्या या शहराला दरवर्षी पुराचा धोका असतो. त्यामुळे जास्तीजास्त लहान मुलांना पोहता येणे गरजेचे आहे. नदी आणि खाजगी तलाव किंवा विहिरी पोहण्यासाठी तितक्याशा सुरक्षित नाहीत .
याशिवाय एक क्रीडाकौशल्य म्हणून सुद्धा स्विमिंग कडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील मुलांमध्ये चांगले स्विमिंग कौशल्य असूनही त्यांना सरावासाठी मोठ्या शहरात जावे लागते व ते त्यांना परवडण्या सारखे नसते.
यासाठी मुरगूड शहरातच पोहण्याचा तलाव (स्विमिंग पूल) झाला पाहिजे अशी मागणी मुरगूडच्या नागरिकांनी नगरपरिषदे कडे केली आहे.
माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी ,सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मंडलिक,भगवान लोकरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने सदरचे निवेदन मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांच्याकडे दिले.
महादेव मंदिरानाजिक असलेल्या क्रीडांगणामध्ये स्विमिंग पूला साठी जागा उपलब्ध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
Comments
Post a Comment