कवठेसार येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऊरसाला सुरुवात.

कवठेसार येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या ऊरसाला सुरुवात.

----------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

----------------------------

कवठेसार येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद बादशाह उरसानिमित कवठेसारच्या फकीर मानुल्लाशा करबल मेल च्या वतीने आयोजित करबल दंगल स्पर्धेत दानोळीच्या पंजतंन करबल मेलने प्रथम क्रमांक पटकाविला.

    स्पर्धा जामा मशीद कवठेसार येथे पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन आम राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच व ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बशीर फकीर होते. यावेळी प्रमुख पाहुणे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर व जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उपस्थित होते. 

       स्पर्धेचा निकाल अनुक्रमे पुढील प्रमाणे 

    1) पंजतन करबल मेल दानोळी, २) पंजतन करबल मेल नेज, ३) सरमस्त करबल मेल आळते,४) गैबीसाहेब करबल मेल दानोळी व बाबू जमाल करबल मेल कुंभोज, 5) चांद पीर करबल मेल रेंदाळ आदि संघ विजयी झाले. 

       यावेळी अकरा संघाने सहभाग घेतला होता. कार्यक्रमाला सरपंच पोपट भोकरे, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष माने, हाजी मकबूल फकीर मिस्त्री, हाजी आलमशा फकीर, बंडा शिंदे, इस्लामपूरचे नगरसेवक पीरअल्ली पुणेकर, राजगोंडा पाटील,बाबासो मगदूम,यशवंत गुरव,ओंकार पाटील,सुभाष पाटील,संतोष भोकरे,बाळासो तेरदाळे, दस्तगीर लतीफ आदि मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन मौला लतीफ,तर आभार रियाज फकीर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.