मातृभाषेच्या सेवेचे व्रत घेणे प्रत्येकाची जबाबदारी– संजय साबळे.
मातृभाषेच्या सेवेचे व्रत घेणे प्रत्येकाची जबाबदारी– संजय साबळे.
------------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
------------------------------------
नांदवडे : येथील भावेश्वरी विद्यालयात महादेवराव बी.एड कॉलेजच्या शालेय आंतरवासिता वर्गाकडून मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही एन कांबळे होते. सोनाली पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय साबळे म्हणाले की,"
मातृभाषेच्या सेवेचे व्रत घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. तिचे जतन करणे आणि अभिमानाने वापरणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मराठी भाषा टिकविण्यासाठी तिचा जास्तीत जास्त वापर करणे आणि तिच्या जतनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मराठी भाषा ही श्रीमंत असून मराठी भाषा ही श्रीमंत असून तिला साहित्य आणि इतिहासाची किनार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण करून संवर्धन केले मराठी भाषेला चांगले दिवस यावेत यासाठी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे."
कार्यक्रमाला पी एम कांबळे, वाय पी पाटील, भक्ती देसाई आदिनाथ गावडे यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचालन तितिक्षा पाटील यांनी केले, तर आभार बी.एन कांबळे यांनी मानले.
Comments
Post a Comment