"संत तुकाराम धाम येथे तुकाराम गाथा पारायण निमित्त रक्तदान, दंतरोग, अस्थिरोग शिबिर संपन्न"
"संत तुकाराम धाम येथे तुकाराम गाथा पारायण निमित्त रक्तदान, दंतरोग, अस्थिरोग शिबिर संपन्न"
------------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------------
रिसोड तालुक्यातील येवती येथे उदयास येत असलेले जिजाऊ सृष्टी व संत तुकाराम धाम यांचे माध्यमातून दरवर्षी अनेक विविध लोकोपयोगी कार्य करण्याचा मानस असलेल्या या समितीचे माध्यमातून यावर्षी सुद्धा स्वर्गीय बाबुरावजी शिंदे यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त रक्तदान शिबिर दंतरोग शिबिर व अस्थिरोग शिबिराचे आयोजन केले. प्रथमत: स्वर्गीय बाबुराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सकाळी ९ वाजता सुरुवात गाथा पारायण कर्ते ह.भ.प. शिवदत्ता शिंदे महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. या शिबिरामध्ये दंतरोग तज्ञ म्हणून डॉ. धनंजय कव्हर, अस्थिरोग तज्ञ डॉ. अजय दहात्रे, तर कवठा आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत असलेल्या रिठद उपकेंद्रा अंतर्गत डॉ. आनंद शिंदे, रूपाली कुटे, पर्यवेक्षक वसंता बोरकर, आशा वर्कर संगीता दळवे, ज्योती शिंदे, मंगल देव्हडे, इत्यादींनी आरोग्य शिबिरामध्ये सेवा दिली. ब्लड बँकेसाठी श्री गजानन ब्लड बँक यांनीही सेवा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.यावेळी गावातील डॉ.शरद शिंदे मेडिकल ऑफिसर, डॉ.संदीप शिंदे,डॉ. बालाजी आरु, डॉ. देव्हडे, सामाजिक कार्यकर्ते नारायण आरु, संतोष राजाराम आरू यांच्या उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला. आहे. यावेळी कार्यक्रमाचे संचालन उमेश शिंदे यांनी केले असून सेवा देणाऱ्या सर्व डॉ. मंडळीचे व प्राथमिक उपकेंद्रातील डॉ.आणी आशा वर्कर यांचा महाराष्ट्रीयन रुमाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिरामध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले, दंतरोगाच्या ३५ रुग्णांची तपासणी केली. तर ६० अस्थिरोग रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. यावेळी गावातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ व सन्माननीय मंडळी उपस्थित होती.
Comments
Post a Comment