मुरगुड येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात सुतार लोहार समाजातर्फे कार्यक्रमांचे आयोजन.

 मुरगुड येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात सुतार लोहार समाजातर्फे कार्यक्रमांचे आयोजन.

 -------------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतिराम कुंभार 

-------------------------------

मुरगुड ता.कागल येथे विश्वकर्मा सुतार - लोहार समाजातर्फे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्सहात विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय लोहार होते. पोलिस उपनिरीक्षक डि.पी.सुतार, कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजप उपाध्यक्ष डॉ. विकास मारुती बिलोरे, समर्थ सोशल फौडेशन च्या झोनल अफिसर रिया सुतार, बॅंक अॅाफ इंडिया मुरगुड शाखेचे शाखा अधिकारी अमित गायकवाड,सुनिल डेळेकर,ओंकार पोतदार, पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर लोहार प्रमुख उपस्थित होते.    


प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. सुतार लोहार समाजातर्फे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.


     यावेळी मुरगुड नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील पाटील यांनी विश्वकर्मा योजने संदर्भात माहिती देवून या योजनेचा लाभ सर्व सुतार लोहार समाजातील बांधवांनी घेण्याचे आवाहन केले. प्रविण उर्फ भोला लोहार म्हणाले, विश्वकर्मा योजनांची नोंदणी सर्वांनी करावी शिवाय विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

                        यावेळी सुनील डेळेकर,ओंकार पोतदार, दिगंबर परीट यांनी मनोगत व्यक्त केली.


कार्यक्रमास सुभाष सुतार, विशाल सुतार ,बाळासो लोहार,रणजित लोहार,अजित लोहार,विलास सुतार,रोहित सुतार,हरिदास लोहार, प्रसाद सुतार, सुनिल सुतार आदी सुतार लोहार समजातील मान्यवर,महिला उपस्थित होत्या.


सूत्रसंचलन नितीन सुतार यांनी केले आभार संजय सुतार यांनी मानले.


 


फोटो ओळी – मुरगूड येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रतिमापुजन प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक डि.पी.सुतार,रिया सुतार,अमित गायकवाड ,सुनिल डेळेकर,ओंकार पोतदार, सागर लोहार आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.