आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा.

 आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा.

-------------------------- 

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

--------------------------- 

वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत हत्तीला विशेष संरक्षण असल्याने त्याला मिरवणुकीत सहभागी करून घेण्यावर अनेक निर्बंध आहेत.


 निवडणुकीतील विजयाचा आनंद करण्यासाठी पिरंगुटमध्ये हत्तीवरून काढलेली मिरवणूक आणि पेढे वाटप मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वन विभागाने मांडेकर यांच्या मिरवणुकीचे संयोजक आणि हत्ती देणाऱ्या सांगली येथील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे.


निवडणुकीच्या तीन महिन्यांनंतर शंकर मांडेकर यांचा विजय साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री पिरंगुट येथे ‘हत्तीवरून मिरवणूक आणि १२५ किलो पेढे वाटप’ असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी खास सांगलीवरून श्री गणपती पंचायतन देवस्थानचा हत्ती आणण्यात आला होता. मांडेकर यांची हत्तीवर बसून मिरवणूक काढण्यात आली. या संदर्भातील छायाचित्रे आणि चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाल्याचे निदर्शास आल्यानंतर पुणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आदित्य परांजपे यांनी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागातून याप्रकरणाची अधिक माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.