११ हजार ५४० वीज ग्राहकांनी अभय योजनेत भरले ९ कोटी ६४ लाख.

 ११ हजार ५४० वीज ग्राहकांनी अभय योजनेत भरले ९ कोटी ६४ लाख.

--------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

--------------------------------------

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत संधी.

थकबाकी न भरल्यास कायदेशीर कारवाई अटळ.

*, दि.२० फेब्रुवारी २०२५ :* बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या (पी.डी.) राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना आणली आहे. ३१ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या योजनेत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत आहे. कोल्हापूर परिमंडतील ११ हजार ५४० वीज ग्राहकांनी ९ कोटी ६४ लाख रुपयांची थकबाकी भरली आहे. उर्वरित पी.डी. ग्राहकांनीही योजनेचा लाभ घेत थकबाकीमुक्त होऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.


         ३१ मार्च २०२४ पर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पी.डी.) महावितरणच्या ग्राहकांसाठी गतवर्षी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे. आतापर्यंत ‌कोल्हापूर परिमंडलातील 11 हजार 540 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 9 कोटी 64 लाख रुपयांचा भरणा केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६ हजार ९०० ग्राहकांनी ६ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला आहे तर सांगली जिल्ह्यातील ४ हजार ६४० ग्राहकांनी ३ कोटी ११ लाख रुपयांचा भरणा केला आहे.   यापैकी ७८७ ग्राहकांनी नवीन वीज जोडणी करता अर्ज केला असून, ४६५ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली असून उर्वरित ग्राहकांची प्रक्रिया सुरु आहे.


*वीजबिल थकबाकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल*

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास  कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.


*अशी आहे अभय योजना*

       महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण ने केले आहे. 


*३१ मार्च २०२५ पर्यंतच मुदतवाढ* 

         या योजनेचा कालावधी 30 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत चालू  ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र 31 मार्च 2025 नंतर या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


*असा लाभ घ्या*

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून व मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. वीजग्राहक 1912 किंवा 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा  एकदा नियमित  वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.


*तर दुसरे चालू कनेक्शन होईल कट…*

महावितरणतर्फे पी.डी. ग्राहकांची पडताळणी सुरू आहे. एखाद्या ठिकाणी जर पी.डी.च्या जागी दुसऱ्या नावाने वीजजोडणी सुरू असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकाकडून ती वसूल करण्यात येईल अथवा तेथे चालू असलेला वीजपुरवठा महावितरण खंडित करेल तसेच कायदेशीर कारवाईस ग्राहकास सामोरे जावे लागेल. तसेच एखाद्या ठिकाणी जर पी.डी. ग्राहक असेल व त्या ग्राहकाची इतरत्र कुठे वीजजोडणी असल्यास त्या जोडणीवर पी.डी.ची थकबाकी वर्ग करून ती वसूल केली जाईल व कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच पीडीच्या जागी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पी.डी. ग्राहकांनी तातडीने अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.