गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील अतिक्रमणे हटवली.

 गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील अतिक्रमणे हटवली.

---------------------------

सांगवडे   प्रतिनिधी

विजय कांबळे

---------------------------

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली.  एमआयडीसी परिसरात दविसभर ही मोहीम राबवण्यात आली. गोकुळ चौक, एमआयडीसी फाटा ,शेवट बस स्टॉप, भाजी मंडी आदी भागांतील पक्की अतिक्रमणे यामध्ये पाडण्यात आली. अतिक्रमणधारकांनी एमआयडीसी ऑफिसच्या या अतिक्रमण मोहिमेचा चांगलाच धसका घेतला. अनेकांनी कारवाईपूर्वीच आपली अतिक्रमणे काढून घेतली. प्रशासनाच्या या कारवाईचे उद्योजकांनी स्वागत केले आहे.


           वाढत्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एमआयडीसी ने मागील दोन आठवड्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता उमेश देशमुख, उपअभियंता ए.आय. नाईक, उपरचनाकार अभिजीत कुलकर्णी ,अनंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला प्रथमच यश मिळाले. आतापर्यंत पाचशेच्या वर टपऱ्या, हातगाड्या व पक्की अतिक्रमणे हटवण्यात आली. एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यापासून सुरू झालेली ही मोहीम संध्याकाळी भाजी मंडईत येऊन थांबली. यावेळी टेम्पो चालक संघटनेने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर अतिक्रमण धारकांनी आधीच आपली खोकी काढून घेतल्यामुळे या अतिक्रमण पथकाला फारसा त्रास झाला नाही. पुन्हा  अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा ए. आय .नाईक यांनी दिला आहे. 


गोकुळ शिरगाव एमआयडीसीच्या इतिहासात प्रथमच अशी कारवाई झाल्याने कारखानदार समाधान व्यक्त करत आहेत. फेरीवाले, भाजीवाले, खाद्यपदार्थ व चहाच्या टपऱ्या, तसेच कारखान्याच फलकांनी मुख्य  रस्ते अडवल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला होता.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.