गांधीनगर परिसरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम संपन्न.
गांधीनगर परिसरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम संपन्न.
------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
जिल्हा महीला व बाल विकास विभाग व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अतंर्गत चाईल्ड हेल्प लाईन , कोल्हापूर यांच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव
करवीर तालुक्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता
" बेटी बचाओ बेटी पढाव " मुलींना रेल्वेमध्ये जर काही अडचण आली.तसेच धोकादायक रेल्वे रूळ ओलांडू नका ,रेल्वे स्टेशन व परिसरामध्ये संशयित वस्तू दिसल्यास , कोणतीही अडचण आल्यास १३९ या नंबर वर संपर्क करा .आपली अडचण दूर केली जाईल .या प्रकाराची माहिती
रेल्वे विभागाचे पोलीस निरीक्षक राम महेश पांडे यांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत व शासकीय योजनेची माहिती दिली.
मुलींनी आपले संरक्षण सक्षम केले पाहिजे कोणतीही भीती न बाळगता जर का अडचण आल्यास त्वरित 139 किंवा 112 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधून आपण पोलिसांची मदत घेऊ शकता.अशी माहिती राजाराम पोलीस ठाण्याचे पोलीस सचिन वायदंडे यांनी दिली .
यावेळी गडमडशिंगी चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात अतुल चौगुले ,यांनीही ,विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी
भाग्यश्री गावडे, योगिनी बागे, राजश्री दळवाई, मुख्याध्यापक आय.आर भोजने, ए.म भंडारे, के. ए पुजारी यांच्यासह छत्रपती युवराज शाहू महाराज हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते .
Comments
Post a Comment