सोशल मिडीयाचा विवेकशील वापर करणे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नितांत गरजेचा पत्रकार संजय पोवार.
सोशल मिडीयाचा विवेकशील वापर करणे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नितांत गरजेचा पत्रकार संजय पोवार.
-------------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-------------------------------------
शाहुवाडी :सोशल मिडीयाचा विवेकशील वापर करणे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नितांत गरजेचा आहे".असे प्रतिपादन व्याख्याते उमेद सदस्य संजय पोवार –पत्रकार यांनी प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय पेरीड येथे बोलताना केले.अध्यक्षस्थानी प्रा.आर.एस.सुतार होते
शिवाजी विद्यापीठ व प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय मलकापूर – पेरीड ‘ येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रबोधन व्याख्यानमालेत ‘ सोशल मिडीया व आजचा युवक’ या विषयावर प्रबोधनात्मक मांडणी करत समाज माध्यमात गुरफटत चाललेली तरुणाई आज भरकटताना दिसत आहे,समाज माध्यमांचा युवा पिढीवर होणारा चांगला – वाईट परिणाम तसेच फायदे - तोटे या बाबींचे सविस्तर विवेचन केले यावेळी उमेद फाउंडेशनच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली
यावेळी प्राचार्य डॉ.पी.जी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.पी.बनसोडे,NSS प्रतिनिधी प्राजक्ता सुतार, प्राध्यापक वृंद व NSS स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment