राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमला मानोरा - खासगी डॉक्टरांचा सकारात्मक मोठा प्रतिसाद.

 राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमला मानोरा - खासगी डॉक्टरांचा सकारात्मक मोठा प्रतिसाद.

--------------------------------

रिसोड.प्रतिनीधी

रणजीत सिंह ठाकुर

--------------------------------

"मानोरा - पंचायत समिती सभागृहात CME कार्यक्रम संपन्न"

  दि.6, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा मध्ये चालु असलेल्या 100 दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. या करिता वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुका येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची मार्गदर्शन कार्यशाळा हि  वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती मानोरा येथे ५ फेब्रुवारी २०२५ घेण्यात आली.या कार्यक्रमाला डॉक्टर असोशीयेशन (NIMA) मानोरा यांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.श्री.परभनकर, मानोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेशचंद्र चापे,डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ . अमोल भगत,जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने, कुष्ठरोग पर्यवेक्षक खरतडे,पि.पि.एस.एय जिल्हा कोऑर्डिनेटर डिगांबर महाजन, क्षयरोगवरिठ उपचार पर्यवेक्षक नकुल ढोके, कुष्ठरोग तंत्रज्ञ शुभम महुळकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ फिरोज पटेल,एल टी.एल.एस रवी बर्वे,क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादूर,संदित कटकतलवारे यांची उपस्थिती. 

         

 डॉ. परभणकर यांनी टीबी मुक्त भारत अभियान संदर्भात मार्गदर्शन केले असून देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना आवाहन केले आहे की भारत हा 2025 पर्यंत टीबी मुक्त झाला पाहिजे याकरिता आपण सर्वांनी एक संकल्प केला आहे. या संकल्पना साठी सर्वांचे योगदान हे महत्त्वाचा आहे. आपण सर्व खाजगी वैद्यकीय सेवेतून देखील या अभियानाला आपले योगदान देऊन सहकार्य करणे हे देशाच्या विकासाला साथ आहे. यांनी टीबी मुक्त व कुष्ठरोग मुक्त भारत अभियान आणि 100 दिवस विशेष मोहिम,BCG लसीकरण,साई टी.बी मार्गदर्शन करून पेशंट संदर्भात येणाऱ्या अडचणी समस्या यावर सविस्तर मार्गदर्शन करून खाजगी डॉक्टर यांच्याकडे येणारे TB  संशयित  व कुष्ठरोग पेशंट यांचे उपचार समुपदेशन करून टीबी आजार हा उच्चार पूर्ण केल्यास बरा होतो.हा आपण लक्षात आणून देणे गरजेचे आहे. वरिष्ठ कुष्ठरोग पर्वेक्षक श्री.खरतडे  यांनी कुष्ठरोग संदर्भातील माहिती देऊन कुष्ठरोगाचे प्रकार व त्याच्यावर उपाय आणि समुपदेशन अशा अनेक विषयावर द्वारे प्रेझेंटेशन करून सविस्तर अशी माहिती दिली.पि.पि.स.एय जिल्हा समन्वयक डिगाबर महाजन यांनी देखील खाजगी डॉक्टर यांना आपल्या रुग्णालयात संशयित रुग्ण आढळल्यास कसे हाताळले पाहिजे या संदर्भात माहिती दिली. यावेळी खाजगी डॉक्टरांचा मोठा सक्रिय आणि सकारात्मक सहभाग मिळाला असून दिलेल्या माहितीबद्दल किती रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ करून आढळणारे टीबी रुग्ण हे आजारापासून मुक्त करण्याकरिता आमचे सर्वांचे योगदान राहिलं असे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व उपस्थित सर्व डॉक्टर शाब्दिक उद्गार सकारात्मक रूपातून दिले आहेत.  यावेळी डॉ.श्री.परभनकर,मानोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेशचंद्र चापे,डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.अमोल भगत,जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लूनसूने, कुष्ठरोग पर्यवेक्षक खरतडे,पि.पि.एस.एय जिल्हा समन्वयक डिगांबर महाजन, क्षयरोग विभाग वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक नकुल ढोके,कुष्ठरोग तंत्रज्ञ शुभम महुळकर, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ फिरोज पटेल,एल टी.एल.एस रवीकुमार बर्वे,क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादूर,संदिप कटकतलवारे यांची उपस्थिती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान लुनसूने यांनी केली उपस्थित सर्वांचे आभार रविकुमार बर्वे यांनी मानले. या कार्यक्रमाला मानोरा डॉक्टर असोसिएशन यांचा मोठा सहभाग यावेळी मिळाला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.