विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी )शाळेत पाद्यपूजन व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न
विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली (ता. राधानगरी )शाळेत पाद्यपूजन व पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न.
-------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------
विद्यामंदिर कोनोली तर्फ असंडोली(ता. राधनागरी )शाळेत आज सिद्धगिरी मठ कनेरी तसेच शाळेच्या वतीने पाद्यपूजन व पाककला स्पर्धा याचे आयोजन केले होते .सुरुवातीला मुख्याध्यापक श्री डी एस पाटील यांनि कार्यक्रमाचे प्रस्तावित करून सर्व उपस्थित मान्यवर, स्पर्धक माता पालक, यांचे स्वागत केले. सर्व माता पालकांचे विद्यार्थ्यांनी पाद्यपूजन करून त्यांचे औक्षण केले .सर्व मातांनी आपल्या मुलांना पाद्यपूजन नंतर आशीर्वाद दिले .यावेळी संपूर्ण कार्यक्रमात एक भावनिक वातावरण निर्माण झाले. श्री सिद्धगिरी मठाच्या स्वयंसेविका सौ. सायली सारंग मॅडम यांनी आई-वडिलांनी मुलांच्यावर कसे संस्कार करावे याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. उद्याची भावी पिढी निर्माण करत असताना त्यांच्यावर कोणत्या प्रकारे संस्कार झाले पाहिजेत याबाबत मातापालकांना उद्बबोधित केले .कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पाटील,उपाध्यक्ष श्री फिरोज पखाली,सर्व सदस्य, माजी अध्यक्ष श्री तुकाराम कांबळे,ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वृषाली टिंगे , श्री सिध्द गिरी मठाचे श्री युवराज पाटील सर,श्री पांडुरंग पाटील सर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .
या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 56 स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सहभाग नोंदवला. श्री सिद्धगिरी मठाच्या सौ माधुरी कोंडे, सौ मधुरा आठल्ये,सौ जयश्री किरुळकर मॅडम यांनी पाककला स्पर्धेचे परीक्षण केले. यामध्ये प्रथम क्रमांक सौ. सविता सर्जेराव मोहिते, द्वितीय क्रमांक सौ. अश्विनी संदीप जाधव, तृतीय क्रमांक सौ. वर्षा ज्ञानदेव पाटील, तर उत्तेजनार्थ सौ अर्चना तुकाराम कांबळे आणि सौ आरिफा पखाली यांना मिळाला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सदाशिव अस्वले सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. आनंदा पाटील सर आणि कु. पुजा पाटील मॅडम यांनी केले. शेवटी सौ. नंदा जाधव मॅडम यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment