कुंभोज प्राथमिक आश्रमशाळेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण-सपना राठोड.
कुंभोज प्राथमिक आश्रमशाळेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण-सपना राठोड.
---------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------
कुंभोज तालुका हातकलंगले येथे कैलासवासी रामभाऊ माळगे सामाजिक शैक्षणिक केंद्र पेठ वडगाव अंतर्गत प्राथमिक आश्रम शाळा कुंभोज यांच्या रोप्यमहोस्तवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता शाळेच्या प्रणागणात करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विनयरावजी कोरे, आमदार अशोकरावजी माने ,आमदार राहुल आवाडे, व विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी महिलांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिवसभर रोप्यमहोस्तवी वर्षानिमित्त अनेक सामाजिक शैक्षणिक व राजकीय व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मानिकलालजी राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिले आहे.
सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक संचालक सुनिता नेरलेकर, वारणा दूध संघाची संचालक अरुण पाटील अमित घवले, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे तसेच शाळा समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमासाठी कुंभोज परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान संस्थेच्या संचालक मार्गदर्शक सपना राठोड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment