ग्रामपंचायत मानोली तालुका मंगरूळपीर येथे मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रम.
ग्रामपंचायत मानोली तालुका मंगरूळपीर येथे मेरी पॉलिसी मेरे हाथ उपक्रम.
-------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------
पिक विमा योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात भारतीय कृषी पीक विमा कंपनी कार्यरत असून जिल्ह्यात मेरी पॉलिसी मेरे हाथ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मेरी पॉलिसी मेरे हाथ या उपक्रमा-अंतर्गत रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक विमा काढलेला आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिक विमा पॉलिसी वाटप करण्यात येत आहेत.
दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामपंचायत *मानोली* तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम येथे *मेरी पॉलिसी मेरे हाथ आणि फसल विमा पाठशाळा* हा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमादरम्यान रब्बी पीक विमा पॉलिसी २०२४-२५ वाटप करण्यात आल्या, यावेळी शेतकऱ्यांना पिक विमा योजने संदर्भात माहिती देण्यात आली तसेच कृषी रक्षक पोर्टल 14447 आणि PMFBY Chat bot बद्दल समजावून सांगण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स्वाती मनोज मनोहर (सरपंच), नरेश केशव महाकाळ (उपसरपंच), अशोक नारायण महाकाळ (पोलीस पाटील), नामदेव भगत (ग्रामपंचायत कर्मचारी), शेतकरी दत्तात्रय परसराम सरोदे, संदीप महाकाळ, महादेव महाकाळ, प्रदीप महाकाळ, ओमकार महाकाळ, रमेश खरात, लक्ष्मण मनवर, सुभाष मुडे व इतर शेतकरी वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रासाठी मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी अनंता अंभोरे, चंद्रशेखर राठोड, पवन जायभाये उपस्थीत होते.
Comments
Post a Comment