कोल्हापूरच्या पाच वर्षीय अन्वीने केदारकंठा शिखरावरून साजरी केली शिवजयंती, गडकोट संवर्धनाचा दिला संदेश.

 कोल्हापूरच्या पाच वर्षीय अन्वीने केदारकंठा शिखरावरून साजरी केली शिवजयंती, गडकोट संवर्धनाचा दिला संदेश.                      

---------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

 विनोद शिंगे

---------------------------------

अन्विचा गिर्यारोहक क्षेत्रात आणखी एक जागतिक विक्रम*                                                - हिमालय पर्वत रांगेतील, उत्तराखंड राज्यातील, केदारकंठा (समुद्रसपाटीपासून 12500 फूट उंच) हे शिखर कोल्हापूरची जागतिक  विक्रमवीर गिर्यारोहक कु. अन्वी अनिता चेतन घाटगे वय 5 वर्षे 6 महिने हिने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी सर करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवध्वज फडकावून व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करून साजरी केली. शिवजयंती म्हणजे शिव विचाराचा जागर,धिरता, वीरता असून गडकोट - दुर्ग संवर्धन करूयात, शिवजयंती दिवशी डॉल्बीचा वापर टाळूयात हा संदेश. शिखरावर शिव गारद देऊन परिसर दणदणून सोडला   ......                                      - दिनांक 16 फेब्रुवारी रोजी देहरादून ते साक्री असा 210 किलोमीटर प्रवास  करुन साक्री येथे पोहचली .  दि. 17 फेब्रुवारी रोजी  साक्रि येथुन मुख्य चढाईस सुरुवात केली. उणे - 6°C अंश सेल्सिअस तापमान, गोठवणारी थंडी, शिखरावर  चढाई करत  असताना होणारी ऑक्सिजनची कमतरता, बर्फावरील निसरडी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत 2 दिवसाची चढाई करत अन्वी 18 फेब्रुवारी रोजी बेस कॅम्पवर पोहोचली.           - दिनांक 19 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2 .00 वाजता पुन्हा शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली. अंधारातून बर्फाच्छादित जमिनीवरून वाट काढत, निसरड्या बर्फावरून अत्यंत थंडीत उणे -15 °C अंश सेल्सिअस तापमानात अत्यंत धैर्याने व आत्मविश्वासाने, शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावून चढाई करत अन्वी सकाळी 7.00 वा चे सुमारास सूर्योदयाला शिखरावर पोहोचली.                              - केदारकंठा या  बर्फाच्छादित शिखरावर 12,500 फूट उंच व उणे -15° C अंश सेलसिअस तापमानामध्ये स्वतःच्या पायाने चढाई करणारी व परत साक्री  येथे पोहोचणारी  कु.अन्वी ही जगातील सर्वात लहान   गिर्यारोहक  ठरली आहे. अन्वीचा हा सहावा जागतिक विक्रम असून लवकरच त्याचे नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. अन्वीच्या या विक्रमाबाबत शिवा ॲडव्हेंचर चे फाउंडर प्रमोद राणा व युवा वर्ल्डचे तेजस जिबकाठे यांनी प्रमाणपत्र दिले आहे.                       - या अगोदर अन्विच्या नावे गिर्यारोहण क्षेत्रात 5  वर्ल्ड रेकॉर्ड , 6 एशिया बुक ऑफ रेकॉर्ड , 6 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवले असून तीने 62 गडकोट दुर्ग संवर्धन  व स्वच्छता मोहीम केले आहेत. तसेच 250 हून अधिक ,व्यक्ती ,संस्था व संघटना यांनी अन्वी हीस सन्मानित केले आहे. तसेच अन्विने 2100 देशी झाडांची लागवड  केली आहे.                    - या मोहिमेमध्ये प्राध्यापक अनिल मगर, प्रशिक्षक व आई अनिता घाटगे, वडील चेतन घाटगे , गाईड मनोज राणा व इतर  गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.