विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा.

 विक्री बंदचे फलक लावूनही शहरात सहज मिळतो पानटपरीवर गुटखा.


-----------------------------------------

 जयसिंगपूर: प्रतिनिधी

 नामदेव भोसले

-----------------------------------------

जास्त पैसे मोजा, हवे ते मिळवा : कारवाया, नियम केवळ नावालाच.

 एक गुटखा पुडी मिळते पाच रुपयांऐवजी दहा रुपयांना तर दुसरी २० रुपयांची पुडी मिळते ३० रुपयांना......तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला मनाई आहे, पण ती कागदावरचा शहरातील मंदिरे असो किंवा शाळा सर्वच प्रतिबंधित क्षेत्रात पानटपरीवर सर्व काही सर्रास मिळते.तंबाखूजन्य पदार्थामुळे कॅन्सरसारखा दुर्धर आजार होतो. त्यामुळे त्याला शासकीय पातळीवर प्रतिबंध आहे. शाळा-महाविद्यालयांच्या आवारात तर शंभर मीटर अंतरावर अशा प्रकारच्या पदार्थाना विक्रीस मनाई आहे. मात्र, हे सर्व कागदावरच

आहे. जयसिंगपूर, उदगाव, दोनोळी,कोथळी, उमळवाड अनेक पानटपऱ्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन यासंदर्भात खात्री केली. विशेष म्हणजे महाविद्यालयाजवळील पानटपन्यांवर येथे तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा विकला जात नाही अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. परंतु जाणकारांना कुठे काय मिळते ते माहिती आहे आणि दुकानदारदेखील बरोबर संबंधितांना पारखून सहजपणे मागेल ते देत असतो. त्यामुळे तंबाखूविषयी जागृती करून त्यावर कितीही प्रतिबंध घालण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र, यंत्रणांना न जुमानता विक्री सुरू आहे.





चौकट...

कर्करोगाचा धोकातंबाखूचा धूर आणि


१ असलेली काही रसायने कर्करोगजन्य असतात, ते तोंडाच्या पोकळीतील पेशीमध्ये अनुवांशिक बदल घडवून आणू शकतात, ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.


२ तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडातील पेशींची अनियंत्रित वाढ होय. ज्यामुळे ट्यूमर तयार होतो. तोंडाचा कर्करोग जीभ, ओठ, गाल, हिरड्या आणि छप्पर, फरशी आणि तोंडाच्या मागील बाजूस होऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.