गाडगे बाबा जयंती निमित्त मुरगूडच्या तरुणांकडून स्मशानभूमी व स्व खासदार सदाशिवराव मंडलिक स्मारक स्वच्छता.

 गाडगे बाबा जयंती निमित्त मुरगूडच्या तरुणांकडून स्मशानभूमी व स्व खासदार सदाशिवराव मंडलिक स्मारक स्वच्छता.

--------------------------

मुरगूड प्रतिनिधी 

जोतिराम कुंभार 

--------------------------

 स्वच्छतेबद्दल ज्यांनी समाजामध्ये जनजागृती केली अशा संत गाडगेबाबा यांची आज जयंती या जयंतीनिमित्त मुरगूड मधील तरुणांनी स्मशानभूमीची आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता केली. मुरगूड येथील शिवभक्त  सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने तरुणांकडून स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली स्मशानभूमी ही अमंगल जागा म्हणून पाहिली जाते  या ठिकाणी सहसा कोणी येत नाही मात्र अशा परिसराची स्वच्छता होणे देखील गरजेचे आहे हाच ध्यास मनात घेऊन या तरुणांकडून या परिसराची स्वच्छता करण्यात आली सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तब्बल चार तास तरुणांनी या ठिकाणी राबत या दोन्ही परिसराची स्वच्छता केली यामध्ये तब्बल एक ट्रॉलीबॉल कचरा जमा झाला. सकाळी सहा वाजता हातामध्ये झाडू घेऊन या तरुणांनी परिसराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली तरुणांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, तानाजी भराडे, संग्राम डवरी, शिवाजी चौगुले,प्रशांत सिद्धेश्वर, 

 संदीप सावर्डेकर, पप्पू कांबळे मुरगूड सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.