सशक्त भारताच्या उभारणीसाठी संविधानाची मूल्ये आत्मसात करा : प्राचार्य डॉ.टी.एम.पाटील.

 सशक्त भारताच्या उभारणीसाठी संविधानाची मूल्ये  आत्मसात करा :  प्राचार्य डॉ.टी.एम.पाटील.

--------------------------

मुरगूड प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

--------------------------

          सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी व संविधान मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी युवकांनी भारतीय संविधानाचा जागर करणे, ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पद्मश्री डॉ.ग.गो. जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.टी.एम.पाटील यांनी चिमगाव येथे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये' व्याख्यानाचे चौथे पुष्प गुंफताना केले. ते भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून संविधानाचा अमृत महोत्सव आणि युवक या विषयावर आपले विचार व्यक्त करत होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये भारतीय संविधानाचा इतिहास सांगत त्याचे महत्त्व अधोरेखित केले.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमगावचे ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव अवघडे हे होते. यावेळी प्रा रामचंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संविधानाचे महत्त्व अधोरेखित करीत प्रत्येकाने संविधानाचा अंगीकार करावा असे प्रतिपादन केले. यावेळी अमोल एकल, साताप्पा आंगज, बापूसो चौगले, रणजीत एकल, आनंदा वळीवडे, मारुती पुरीबुवा, युवराज आंगज, संतोष अवघडे, अनिल आंगज, साताप्पा कांबळे, संजय मोरबाळे, जयसिंग घाटगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.ए डी जोशी, डॉ. एम ए कोळी, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. दिगंबर गोरे, प्रा. सुशांत पाटील, प्रा. शितल मोरबाळे, प्रा. हर्षदा पाटील, प्रा. तेजस्विनी गुरव तसेच गावातील नागरिक व स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कु.सानिका रणदिवे हिने केले. पाहुण्यांची ओळख कु. निलेश पाटोळे आणि वैष्णवी कुंभार हिने आभार मानले तर सूत्रसंचालन  पूजा माने हिने केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.