नांदगाव येथील पोलिस पाटील यांच्या कुटूंबीयांवर प्राणघातक हल्ला उत्खननाची तक्रार केल्याच्या कारणाने कृत्य.
नांदगाव येथील पोलिस पाटील यांच्या कुटूंबीयांवर प्राणघातक हल्ला उत्खननाची तक्रार केल्याच्या कारणाने कृत्य.
-------------------------------------
शाहुवाडी प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-------------------------------------
शाहुवाडी : नांदगाव येथील पोलीस पाटील सौ सुजाता बाजीराव पाटील यांच्या कुटूंबीयांवर कृष्णात दत्तू पाटील ' त्यांची पत्नी व दोन मुलांनी प्राणघातक हल्ला केला त्यात पोलीस पाटील यांचे पती बाजीराव गोविंद पाटील वय वर्षे (४3)यांच्या पाठीवर तर त्यांचे सासरे गोविंद शंकर पाटील वय वर्षे ( ७०) यांच्या डोण्याजवळ तर दीर नितीन पाटील वय वर्षे ( 30) यांच्यावर डोक्यावर पाठीमागुन खुरप्याने वार केल्याने गंभीर जखमी झाले आहेत
बांबर नावाच्या सामुहीक शेतातील गट नं ४२९ मध्येकृष्णा पाटील यांनी अनधिकृत उत्कलन केले होते त्याबाबत तहसीलदार यांच्या सूचनेनुसार पोलीस पाटील यांनी महसूल विभागाला याबाबत कळवले होते याचा राग मनात धरून शेतामध्ये गेलेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबावर कृष्णा पाटील त्यांची पत्नी शोभा पाटील मुलगा शेखर पाटील व महेश पाटील यांनी पोलीस पाटील यांच्या कुटुंबीयांवर कृपयाने वार करून गंभीर जखमी केले त्यांच्यावर सी पी आर रुग्णालय कोल्हापूर येथे उपचार चालू असून सदर घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली असून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे
Comments
Post a Comment