छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले-आ.अशोक माने.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले-आ.अशोक माने.
--------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------
अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना सोबत घेऊन दिल्लीची मुघलशाही आदिलशाही विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही या जुलमी राजवटी विरुद्ध अखंड संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केली असे प्रतिपादन देशभक्त रत्न कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी वर आयोजित शिवजयंती समारंभात संस्थेचे संस्थापक चेअरमन दलित मित्र आमदार अशोकराव माने यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष समाजभूषण अनिल कांबळे माणगावकर म्हणाली की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व सुलतानी राजवटीत स्त्रियांची अब्रू व सामान्य शेतकरी धोक्यात आलेला असताना या घटकांना संरक्षण देऊन सन्मानाने जगण्याकरता बळ दिले प्रथमतः आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने आणि समाजभूषण अनिल कांबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमास संस्थेचे संचालक वसंतराव कांबळे, कार्यलक्ष्मी संचालक संजय बिडकर,चिप अकाउंटंट विवेक कुलकर्णी,स्वामी समर्थ महिला सूतगिरणीचे कार्यकारी संचालक सुहास राजमाने,विनोद सुतार, सतीश राजमाने, शेषगोंड पाटील जगदीश जाधव,फारुख मुजावर, मोहसीन मुजावर,पंकज मगदूम,सचिन हुपरे संभाजी मगदूम,सचिन शिंदे,बाबू माने इत्यादी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर जी आर माने यांनी केले तर आभार एच आर सदाशिव संपगांव यांनी केले.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment