वाकद गाव तहानलेले ? पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण कधी होणार "? "सध्या स्थितीत गावकऱ्यांना" पाणीपुरवठा करणे गरजेचे !"" त्रस्त ग्रामपंचायत सदस्याचा एल्गार"

 "वाकद गाव तहानलेले ? पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण कधी होणार "? "सध्या स्थितीत गावकऱ्यांना" पाणीपुरवठा करणे गरजेचे !"" त्रस्त ग्रामपंचायत सदस्याचा एल्गार"


----------------------------------

 रिसोड प्रतिनिधी 

रणजीत सिंह ठाकुर 

-----------------------------------

दि.०७/०२/२०२५ रोजी रिसोड गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.रिसोड तालुक्यातील वाकद हे गाव नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या गावाचा पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटला नसून जल जीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम चालू असून जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या बाबीला काम चालू होऊन आज तीन वर्षे लोटली पण काम पूर्ण झाली नाही. या कामामुळे गावातील पाणीपुरवठ्याची जी पाईपलाईन होती ती पूर्णतः उध्वस्त झाल्याने संपूर्ण पाणीपुरवठा बंद आहे. जुन्या वाकद गावालगत दोन विहिरी असून निदान त्या विहिरीहून तरी गावाला सध्या स्थिती त पडत असलेला तुटवडा पूर्ण करावा व वाकद गावकऱ्यांची तहान भागवावी. अशी निवेदनाद्वारे वाकद ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी रिसोड यांच्याकडे केली आहे. या निवेदनाद्वारे असे लक्षात येते की प्रत्येक विभाग आपापल्या परीने टोलवा टोलवीची उत्तरे देत असून गावकरी मात्र पाणी मिळण्यापासून वंचित आहेत. याबाबत अनेक आंदोलने सुद्धा झाली. प्रत्येक वेळी समाधान करण्याचा प्रयत्न झाला पण जलजीवन मिशनचे काम आज पर्यंत पूर्ण न झाल्याने गावकऱ्यांना परत त्याच मार्गाने जावे लागेल का ? असा यक्षप्रश्न गावकऱ्यासमोर निर्माण झाला असल्याने याबाबतची कैफियत रिसोड चे गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन दिली आहे. त्यामध्ये शेख बिलाल शेख कुरेशी माजी उपसरपंच तसा कार्यरत ग्रामपंचायत सदस्य, गणेश नारायण मोरे सदस्य, वर्षाताई गजानन तिरके सदस्या, गंगाबाई सुरेश चोपडे सदस्या, छायाताई मनोज कंकाळ सदस्या, सय्यद अकील सय्यद हुसेन सदस्य या सर्वांनी पंचायत समितीमध्ये येऊन गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन मिशनचे राहिलेले पूर्ण काम करावे व सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या जुन्या दोन विहिरीमध्ये पाणी आहे व त्यावरून गावासाठी पाणीपुरवठा करावा व तो करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे अशी मागणी केली. जर पाणीपुरवठा लवकरात लवकर चालू केला नाही तर पूर्वीप्रमाणेच रास्ता रोको त्याला ठोको, किंवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये व जर आल्यास सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असे यावेळी बोलतांना सांगितले व तसेच निवेदनातही नमूद आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.