युवा संसदेच्या माध्यमातून नेतृत्वगुणांची पेरणी- प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील.
युवा संसदेच्या माध्यमातून नेतृत्वगुणांची पेरणी- प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील.
----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
"अभिमत युवा संसद ही युवकांसाठी प्रेरणादायी असून यातून नेतृत्वगुणांची पेरणी होते" असे मत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी केले, ते अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत अभिमत युवा संसद या कार्यशाळेच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "आजच्या काळात देशापुढील असणाऱ्या अनेक समस्यांबाबत उदासीनता दिसून येत आहे, सामाजिक आर्थिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रातील जाण आणि भान कमी होताना दिसते. अशावेळी युवकांना भान आणि सहभागाच्या दृष्टीने अभिमत युवा संसद प्रेरणादायी राहील". या कार्यशाळेचे उद्घाटन गगनबावड्याच्या सरपंच मा. मानसी कांबळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेस पुष्पहार अर्पण करून झाले. स्वागत आणि प्रास्ताविक अग्रणीचे समन्वयक डॉ. एस. एस. भोसले यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन प्रा. ए. जी. धामोडकर यांनी केले तर आभार प्रा. ए. जी. गावकर यांनी मानले. कार्यशाळेतील कृतीकार्यक्रमात लोकसभेची प्रतिकृती करून लोकसभा सभापती, राजदंड, प्रश्नपटल, विरोधी व सत्तारूढ पक्ष, प्रेक्षा गॅलरी, छाया व पत्रकार कक्ष अशी हुबेहूब रचना केली होती. विद्यार्थी व प्राध्यापक वेगवेगळ्या राजकीय व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत प्रश्नोत्तरात रंगत भरत होते आणि प्रेक्षा गॅलरीतील राजकीय चिकित्सक ध्यान मग्न होऊन श्रवण करत होते. प्रश्नोत्तराच्या तासात भारताचे जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न, देशांतर्गत कायदा सुव्यवस्था, जागतिक पर्यावरण, दूषित पाणी, महिला आणि आरोग्य, भाववाढ, बेरोजगारी या आणि अशा विषयांवर वाद विवादात्मक चर्चा झाली. यावेळी सत्तारूढ पक्षाच्या वतीने डॉ. एस. एस. पानारी यांच्या नेतृत्वात प्रा. वंदना पाटील, डॉ. एस. एस. भोसले, प्रा. ए. आर. गावकर, प्रा. आर. आर. सरनोबत, प्रा. पी. बी. शिंदे, रविना कांबळे, दिव्या बावडेकर, तस्मिया पाटणकर आदींनी सक्रीय सहभाग नोंदवला तर विरोधी पक्षाकडून प्रा. एच. एस. फरास यांच्या नेतृत्वात प्रा. ए. एस. जमादार, प्रा. एस. एस. घाटगे, प्रा. ए. जी. धामोडकर, प्रा. एस. ए. मोहिते, प्रा. आर. आर. नर, सुप्रिया महाडिक, दिक्षा वरेकर आदींनी सक्रीय सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी सभापती पदावरून सभागृहावर नियंत्रण ठेवले. समारोपीय सत्रात प्रा. ए. बी. मोहिते, प्रा. उमेश कांबळे यांनी तर कु. सुप्रिया महाडिक आणि कु. कोमल कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली. गगनबावडा आगार व्यवस्थापिका मा. वासंती जगदाळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, म. ह. शिंदे महाविद्यालय तिसंगीचे प्रा. ए. बी. मोहिते, महिला महाविद्यालय क. बीडचे प्रा. कांबळे, शासकीय कंत्राटदार मा. विशाल देसाई, मा. संभाजी पाटील, अग्रणी समन्वयक डॉ. एस. एस. भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सत्राचे सूत्रसंचलन प्रा. एस. एस. घाटगे यांनी केले आणि आभार प्रा. एस. ए. मोहिते यांनी मानले. या कार्यशाळेसाठी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. देसाई देसाई आणि सचिव डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.
Comments
Post a Comment