शिवजयंती निमित्त मुरगुड मध्ये मोफत शिवमूर्ति वाटप कार्यक्रम उत्साहात पडला पार.
शिवजयंती निमित्त मुरगुड मध्ये मोफत शिवमूर्ति वाटप कार्यक्रम उत्साहात पडला पार.
--------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------------
शिवजयंती घराघरात शिवजयंती मनामनात या उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवभक्त मुरगुडकर यांच्या वतीने शिवजयंती निम्मित मोफत मूर्ती वाटप कार्यक्रम शिवतीर्थ मुरगूड येथे पार पडला. शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी आणि शिवरायांच्या विचारांचा जागर लहान थोरांमध्ये रुजावा, यासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे संकेत भोसले यांनी बोलताना सांगितले . सकाळी 8.30 वाजेपासून वाजल्यापासून शिवतीर्थ मुरगड येथून या शिवमूर्ती वितरित करण्यात आल्या यावर्षी जी लहान मुले छोटा मंडळ स्थापन करून शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात अशा मंडळांना प्राध्यान्य देण्याचा संकल्प करण्यात आल्याचे तसेच गेल्यावर्षी 75 मूर्ती यावर्षी 2 फुटाच्या 50 मूर्ती वाटपाचे करण्यात आले होते यावेळी मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्यासह , आकाश पाटील निढोरी,प्रा. संभाजी आंगज, विजय सापळे , इंजिनिअर बाळासाहेब सूर्यवंशी,माजी नगरसेवक सुहास खराडे, सुनील रनवरे, प्रा. चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्जराव भाट ,ओंकार पोतदार, जगदीश गुरव ,तानाजी भराडे ,संकेत भोसले, प्रकाश पारिशवाड ,संकेत शहा,यांनी हे संपूर्ण नियोजन केले .
Comments
Post a Comment