नांदेड येथे ९ रोजी परदेशी कुंभार समाज वधु वर परिचय मेळावा व गुणवंतांचा सन्मान सोहळा.
नांदेड येथे ९ रोजी परदेशी कुंभार समाज वधु वर परिचय मेळावा व गुणवंतांचा सन्मान सोहळा.
--------------------------------
लोहा, प्रतिनिधी
अंबादास पवार
--------------------------------
परदेशी कुंभार समाज महाराष्ट्र व कुंभदीप स्तंभ समाजोन्नती बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ रोजी रविवारी परदेशी कुंभार समाजातील वधू-वर परिचय मेळावा व समाजातील गुणवंतांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
परदेशी कुंभार समाजातील बांधवांनी एकत्र यावे, विचारांची आदान प्रदान व्हावी, समाजातील विवाह योग्य तरुणांची लग्न जुळवेत तसेच समाजातील गुणवंतांचा गौरव व्हावा या उद्देशाने हिंगोली गेट नांदेड येथील श्री लोकमान्य मंगल कार्यालयात दि. ९ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजताच्या कालावधीत वधु वर परिचय मेळावा व गुणवंतांचा गौरव आयोजित करण्यात आला आहे. सदरील सोहळ्यास न्यायाधीश मनोज बनचरे (यवतमाळ), उपजिल्हाधिकारी सूरेश बगळे (नागपूर), उपजिल्हाधिकारी मनोज (बंबरुळे) लोणारकर (अकोट) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ताधारक तसेच विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी, कर्मचारी व इतरांचा गौरव सन्मान करण्यात येणार आहे. सदरील सोहळ्यास समाजातील बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन विष्णुपंत परडे, मधुकर जोरुळे, बालाजी बंबरुळे, कैलास बंबरुळे आदींनी केले आहे.
Comments
Post a Comment