आदर्श गुरुकुल अकॅडमीमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

 आदर्श गुरुकुल अकॅडमीमध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------

विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनावर आधारित सुंदर असा परिपाठ सादर केला.यावेळी विज्ञान शिक्षिका सौ. व्ही यू पाटील यांनी विज्ञान दिन का साजरा केला जातो याबद्दल माहिती सांगितली, तर श्री एस डी पाटील यांनी विविध अंधश्रद्धा आणि त्यामागील शास्त्रीय कारण सांगितले. त्यापूर्वी सकाळ सत्रात  विज्ञानावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर विज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये पाच फेऱ्या अंतर्गत ही स्पर्धा उत्साहात पार पडली.त्यानंतर विज्ञानातील छोटे छोटे प्रयोग आणि त्या मागील शास्त्रीय कारण सांगत विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. आणि या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विज्ञान दिन अत्यंत उत्साहात पार पाडत विज्ञान दिनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेतला. यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. डी एस घुगरे सर,सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे मॅडम यांची  प्रेरणा लाभली तर ग्रीन व्हॅली मुख्याध्यापक आर बी शिवई, पर्यवेक्षक एस जी जाधव,प्रशासक श्री एस ए पाटील, श्री.एम एच चौगुले,सौ एस एस गिरीगोसावी तसेच सर्व विज्ञान शिक्षक -  शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.