इतिहास बद्दलची ताकद महिलांमध्ये कशी असते इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्व दाखवून दिले आहे माजी सभापती अक्काताई नलवडे.
इतिहास बद्दलची ताकद महिलांमध्ये कशी असते इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्व दाखवून दिले आहे माजी सभापती अक्काताई नलवडे.
------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------
इतिहास बदलण्याची ताकद महिलांमध्ये कशी असते हे इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वातून जगाला दाखवून दिले होते. कितीही प्रतिकूल स्थिती असली तरी त्यातून बाहेर पडून यशस्वी झाल्याचे अनेक महिलांनी यापूर्वी दाखवून दिले आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःला कमी लेखू नये. आपल्यातील क्षमता ओळखा, रोजच्या रहाटगाडग्यात स्वतःकडे लक्ष द्या, योग्य आहार व्यायाम याच्या मदतीने स्वतःला जपा असे प्रतिपादन भुदरगड पंचायत समितीच्या माजी सभापती अक्काताई प्रवीण नलवडे यांनी केले त्या सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथे झालेल्या महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगुले होत्या. येथील आदर्श महिला सहकारी दूध संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी विजयमाला साताप्पा पाटील यांनी महिला लाजेखातर आपल्याला होणारा त्रास इतरांना सांगत नाहीत. कामाच्या व्यापात शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे भविष्यात अनेक आजारांना सामोरे जावे लागते प्रसंगी जीवावरही बेतते. हे टाळण्यासाठी महिलांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. सरपंच अश्विनी चौगुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना घराच्या बाहेर पडण्याची संधी मिळाली या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करा असे सांगितले.
यावेळी स्पर्धा परीक्षेतील विविध ठिकाणी निवड झालेल्या, वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झालेल्या मुलींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा योजना व बचत गट चळवळीत महिलांना असलेल्या संधी बाबत राजेंद्र चव्हाण, आशा सेविका पूजा चौगुले यांनी मार्गदर्शन केले.राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर ग्राम पंचायत सदस्य सुवर्णा पोवार, तहसील कार्यालय प्रतिनिधी रेखा मुळे, संस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय पारकर, उपाध्यक्ष आनंदी चौगुले उपस्थित होत्या. आर डी निउंगरे यांनी स्वागत,प्रास्ताविक केले.संजय पारकर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या सर्व संचालिका उपस्थित होत्या पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम झाल्याने महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली.
ठळक - तहसीलदार अनिता देशमुख यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही तरी संदेश पाठवून महिलांना शुभेच्छा दिल्या.
आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोबाईल द्वारे महिलांशी संवाद साधला. महिलांचे आरोग्य चांगल्या प्रकारचे राहावे यासाठी शासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. अनेक नवीन सेवा सुविधा सुरू करण्यात येत आहेत याचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
फोटो ओळ
सोन्याची शिरोली येथे झालेल्या महिला दिन कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करताना अक्काताई नलावडे ,विजयमाला पाटील, अश्विनी चौगुले, रेखा मुळे, संगीता पारकर, आनंदी चौगुले आदी.
Comments
Post a Comment