वडनेर येथील राष्ट्रध्वजावर येणाऱ्या तारा हटवण्यास सुरुवात.

 वडनेर येथील राष्ट्रध्वजावर येणाऱ्या तारा हटवण्यास सुरुवात.

---------------------------------

अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

गजानन जिरापुरे

---------------------------------


खा.अनिल बोंडे यांनी दिल्या होत्या महावितरणला सूचना गावकऱ्यांनी मानले बोंडे यांचे आभार.

दर्यापूर: तालुक्यातील वडनेर गंगाई येथील झेंडा चौकात राष्ट्रध्वजावर विद्युत वाहिनीच्या तारा येत असल्याने झेंडावंदन करताना नागरिकांना अडचण व्हायची. अखेर या तारा हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी याबाबत महावितरणला सूचना दिल्यानंतर हे काम मार्गी लागत असल्याने ग्रामस्थांनी अनिल बोंडे यांचे आभार मानले आहेत.


दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई येथील झेंडा चौकात गणतंत्र दिन व स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जाते. मात्र ज्या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणाहून विद्युत वाहिनी गेली असल्याने ध्वजारोहण करताना ग्रामस्थांना मोठी अडचण होत होती. येथील तारा हटवण्याची मागणी भाजपचे नकुल सोनटक्के, ऋषिकेश इंगळे, विशाल माहुलकर, कुलदीप हागे यांनी केली होती. त्यांनी यासंदर्भात महावितरण विभागाकडे लेखी निवेदन देऊनही दखल न घेण्यात आल्यामुळे नागरिकांनी थेट खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्याकडे धाव घेतली होती. बोंडे यांनी या संदर्भातील कार्यवाही तातडीने दखल घेत झेंडा चौकातील तारा हटवण्यात याव्या, गरिकांना दिलासा द्याव्या अशा सूचना उपकार्यकारी अभियंता काटोले यांना दूरध्वनी वरून दिल्या होत्या. त्यानंतर तातडीने महावितरण विभागाच्या वतीने झेंडा चौकातील राष्ट्रध्वजावर येणाऱ्या तारा हटवण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे झेंडावंदन करताना नागरिकांना आता कोणतीही अडचण जाणार नसल्याने नागरिकांनी खासदार अनिल बोंडे यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.