भालचंद्र कुलकर्णी यांचे आत्मचरित्र भावी पिढीसाठी प्रेरणादायी ;सचिन शिरगावकर.
भालचंद्र कुलकर्णी यांचे आत्मचरित्र भावी पिढीसाठी प्रेरणादायी ;सचिन शिरगावकर.
आत्मकथन शून्यातून शिखराकडे" पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न.
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी ता ४
"धाडसी उद्योजक भालचंद्र कुलकर्णी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची ही कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यश-अपयशाच्या अनुभवातून उद्योजकतेचे धडे मिळतात. आधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक संघटना आणि प्रयोगशीलतेत त्यांनी उमटवलेला ठसा उल्लेखनीय आहे. 'शून्यातून शिखराकडे' एका उद्योजकाचा प्रवास हे पुस्तक नेतृत्व, चिकाटी आणि ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत कवितेद्वारे प्रसिद्ध उद्योजक सचिन शिरगावकर यांनी प्रतिभा नगर येथे आयोजित भालचंद्र कुलकर्णी यांच्या आत्मकथन पर पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केले.
सदर पुस्तकाचे शब्दांकन सुप्रसिद्ध लेखिका प्रिया दंडगे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त स्टेट बँक अधिकारी आर. डी. गुप्ते होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सचिन शिरगांवकर यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट व कंपनी सेक्रेटरी प्रदीप गोखले , नोकरी संदर्भ चे संपादक सुहास राजेभोसले , उद्योजक विश्वासराव काटकर आणि निवृत्त शासकीय अधिकारी आर. एच. पाटील यांचा समावेश होता.
पुस्तक प्रकाशनानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून भालचंद्र कुलकर्णी यांच्या उद्योजकीय प्रवासाचा गौरव केला. त्यांनी ज्या संघर्षातून उद्योगक्षेत्रात यश मिळवले, त्याचा प्रेरणादायी प्रवास या आत्मकथनात उलगडला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन बी. ई. कुलकर्णी व त्यांचा परिवार यांनी केले होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री प्रकाशन च्या भाग्यश्री पाटील-कासोटे यांनी तर सूत्रसंचालन पुस्तकाच्या लेखिका प्रिया दंडगे यांनी तर आभार श्री कुलकर्णी यांनी केले.
कोट
"संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे; त्यास न घाबरता समर्थपणे तोंड देणे हीच खरी सार्थकता. अविरत कष्ट आणि नाविन्याची ओढ माणसाला यशापर्यंत घेऊन जाते. हे पुस्तक स्वतःची बढाई मिरवण्यासाठी नव्हे, तर तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आहे. माझा प्रवास एका व्यक्तीला जरी मार्गदर्शक ठरला, तरी त्याचे सार्थक झाले असे मी समजतो."
भालचंद्र कुलकर्णी
संस्थापक, बेसपास्क कंपनी
फोटो ओळ
कोल्हापूर येथे प्रसिद्ध उद्योगपती भालचंद्र कुलकर्णी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना उद्योजक सचिन शिरगावकर, शेजारी भालचंद्र कुलकर्णी ,आर डी गुप्ते प्रदीप गोखले सुहास राजे भोसले विश्वासराव काटकर व इतर
Comments
Post a Comment