सद्गुरू बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव: १० ते १४ मार्च दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद.
सद्गुरू बाळूमामा वार्षिक भंडारा उत्सव: १० ते १४ मार्च दरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद.
-----------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------
आदमापूर, ता. भूदरगड | लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. मुदरगड) येथील सद्गुरू संत बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव २० मार्च ते २८ मार्च २०२५ दरम्यान पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मंदिर व परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर १० मार्च ते १४ मार्च या कालावधीत मंदिरातील दर्शन सेवा आणि अन्नछत्र बंद राहणार आहे. त्यामुळे या चार दिवसांत भाविकांनी दर्शनासाठी येण्याचे नियोजन टाळावे, असे आवाहन देवालय समितीच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
वार्षिक भंडारा उत्सवाच्या तयारीसाठी मंदिर प्रशासनाने नियोजन सुरू केले असून, स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. लाखो भाविक या उत्सवाला हजेरी लावतात, त्यामुळे प्रशासनाने सुविधांची विशेष तयारी केली आहे.
भाविकांनी १० ते १४ मार्च दरम्यान दर्शनासाठी मंदिर बंद राहणार असल्याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment