युवासेना महिला आघाडी यांच्यावतीने निदर्शने.
युवासेना महिला आघाडी यांच्यावतीने निदर्शने.
--------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या क्रूर व निघृण हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेना - युवासेना महिला आघाडी यांच्यावतीने शिरोळ तहसील कार्यालय शिरोळ येथे क्रूरकर्मा वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
उपस्थित शिवसैनिक - युवासैनिकांनी व महिला आघाडी निर्दयी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांच्या निषेधार्थ घोषणा देत निषेध करण्यात आला
यावेळी शिरोळ तालुक्यातील शिवसेना - युवासेना पदाधिकारी व महिला आघाडी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment