सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न.
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न.
----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
----------------------------------
मुरगुड येथील सदाशिव राव मंडलिक महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प तयार करणे अनिवार्य आहे. हे संशोधन प्रकल्प कसे तयार करावेत याचे मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयामध्ये एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शहाजी महाविद्यालय कोल्हापूर चे प्राचार्य डॉ. राजे खान शहाने दिवाण हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प कसा तयार करावा व विषयांची निवड कशी करावी याविषयी संबोधन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी समाजात गेले पाहिजे त्यांचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत व त्यावर संशोधन केले पाहिजे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ अद्वैत जोशी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. एम ए कोळी यांनी मानले. सूत्रसंचालन नितेश रायकर त्यांनी केले. सदर कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होईल असा आशावाद अनेक विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment