भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त 101 रक्तदात्यांनी रक्तदान.
भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त 101 रक्तदात्यांनी रक्तदान.
----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------------------
राधानगरी तालुक्यातील फेजी वडे येथील रमाबाई नगर येथे भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यामध्ये 101 रक्तदात्यांनी रक्तदान केल्या असल्याची माहिती संयोजक अनिकेत कांबळे यांनी दिली
भगवान गौतम बुद्ध 2569 व्या जयंतीनिमित्त भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिर आयोजित केले त्यास रमाबाई नगर मधील बी टी एम बॉईज च्या 101 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून देशाला हातभार लावला हे ब्लेड कागल येथील महालक्ष्मी ब्लड बँके चे डॉक्टर ऋतुजा कोळी यांच्याकडे देण्यात आले या रक्तदान शिबिरास महालक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर ऋतुजा कोळी व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले असल्याचे संयोजक अनिकेत कांबळे यांनी सांगितले
या कार्यक्रमास रमाबाई नगर येथील विशाल कांबळे अमोल कांबळे भैरवनाथ कांबळे रामचंद्र कांबळे आकाश कारंजेकर शुभम कांबळे वैभव कांबळे आकाश कांबळे रोहन कांबळे प्रवण कांबळे व महिला बीटीएम बॉईज चे कार्यकर्ते हजर होते
शेवटी बाबासाहेब आंबेडकर गायन पार्टीच्या मार्फत बौद्ध गीताने कार्यक्रमाची सांगता झाली आहे
Comments
Post a Comment