एमपीएससी परीक्षेमध्ये पलूस येथील शुभम सुनील मुळे हा राज्यात 17 वा.
एमपीएससी परीक्षेमध्ये पलूस येथील शुभम सुनील मुळे हा राज्यात 17 वा.
----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील शुभम सुनील मुळे हा एमपीएससी परीक्षेमध्ये राज्यात सतरावा क्रमांकाने आला असल्याने पलूस गावामध्ये फटाक्याच्या आतिश बाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला
एमपीएससी परीक्षेसाठी राज्यातून दोन लाख विद्यार्थी अर्ज केले होते त्यामध्ये 7000 विद्यार्थी सिलेक्ट झाले असून त्यांची परीक्षा 28 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली त्याचा निकाल नुकताच लागला असून त्यामध्ये पलूस जिल्हा सांगली येथील कुमार शुभम सुनील मुळे हा राज्यात सतरावा क्रमांकाने उत्तीर्ण झाला असल्याने कुमार शुभम यांच्या आई श्रीमती सुरेखा सुनील मुळे व चुलते बहीण यांना मोठा आनंद झाला आहे तसेच कुमार शुभम याचे मित्रांनी शुभम याचे कौतुक करून फटाके अतिषबाजी करून अभिनंदन चा डिजिटल बोर्ड गावाच्या चौकामध्ये लावण्यात आला
तसेच एमपीएससी परीक्षेत राज्यात सतरावा क्रमांकाने कुमार शुभम मुळे उत्तीर्ण झाल्याबद्दल क्रांतीसमूह व क्रांती कारखानाचे चेअरमन शरद भाऊ लाड व व्हा चेअरमन दिगंबर दादा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी निकम सर राहुल जगताप सागर रेपाळ संदीप क्षीरसागर यांच्या अनेक कार्यकर्ते नेते मंडळी हजर होते
Comments
Post a Comment