सोन्याच्या दागिन्यांसाठी पतीने केला पत्नीचा खून 24 तासाच्या आत आरोपी जेरबंद.
सोन्याच्या दागिन्यांसाठी पतीने केला पत्नीचा खून 24 तासाच्या आत आरोपीला अटक .
------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
------------------------------------
मडिलगे ता आजरा येथे भर वस्तीत रविवारी पहाटे दरोडेखोरांनी पूजा सुशांत गुरव व.व.31 या महिलेचा खून करुन सोन्याच्या दागिन्यांसह दहा लाखांचा ऐवज लंपास केला असल्याचा बनाव करणाऱ्या सुशांत गुरव यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
कर्ज बाजारी असलेल्या सुशांत गुरव यांने आपली पत्नी पुजा गुरव हिच्या कडे दागिन्यांची मागणी केली पत्नी पूजा हिने दागिने देण्यास नकार दिल्याने तिच्या डोक्यात खोऱ्याने वर्मी घाव घातल्याने तिचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी मृत पुजाची दोन जुळी मुले सोपान मुक्ता यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही दरोडेखोरांनी दाराची कडी उचकटल्याची दिसत नाही तिजोरीला कोणत्याही प्रकारे फोडल्याची दिसली नाही भर वस्तीत दरोडा पडला असता शेजाऱ्यांना कशी काय जाग आली नाही या सशंयावरून आजरा पोलिसांच्या व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यानंतर पोलिसांनी आपला हिसका सुशांत गुरव यास दाखवताच आपनच आपली पत्नी पुजाचा खुन केल्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग इचलकरंजी निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आजरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक गळवे, पोलीस अमलदार समीर कांबळे, प्रकाश पाटील, सतीश जंगम, अमित सर्जे,दीपक घोरपडे, कृष्णात पिंगळे, राजू कांबळे, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन जाधव, सोमराज पाटील, रोहित मर्दाने, राजेश राठोड, सुहास कांबळे, सुशिल पाटील, हंबीरराव अतिग्रे ,अनिल जाधव,व पो ऊ.नि.संजय पाटील, युवराज धोंडे, कविता कदम, संदीप म्हस्वेकर, साजित शिकलगार,दयानंद बेनके, पांडुरंग येलकर, रेश्मा नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे, नितीन पाटील, अमर उबाळे ,विकास कांबळे, वैभव गवळी, सूर्यकांत सुतार, संजय नवलगुंदे, महांतेश पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रशांत सुतार, रामदास वाघ, प्रकाश पुजारी, विशाल आंबोळे, दीपक किल्लेदार, सुशांत शिंघन, यांनी हा सदरचा गुन्हा उघडकीस आणला
Comments
Post a Comment