मातंग न्याय हक्क परिषदेसाठी उद्या बिंदू चौक येथे भव्य अशी परिषद पट्टण कोडोलीतून सुरुवात.

 मातंग न्याय हक्क परिषदेसाठी उद्या बिंदू चौक येथे भव्य अशी परिषद पट्टण कोडोलीतून सुरुवात.

-----------------------------

 हुपरी प्रतिनिधी 

जितेंद्र जाधव

-----------------------------

 पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोल्हापूर यांच्या वतीने तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मातंग न्याय हक्क परिषदेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मातंग समाज एकवटण्याच्या दृष्टीने भव्य परिषद उद्या 17 मे 2025 रोजी सायंकाळी चार वाजता ऐतिहासिक बिंदू चौक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे या परिषदेला पट्टणकोडोली पंचक्रोशीतील हजारो मातंग बांधवांचा सहभाग होणार आहे या परिषदेच्या अनुषंगाने नियोजन बैठक आज पट्टणकोडोली येथे आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी या कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे युवक नेते निखिल बिरांजे  यांनी उपस्थित त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले तर समाजाचे नेते खंडू दाभाडे यांनी भावनिक आणि संघर्षमय मनोगत व्यक्त केले दाभाडे यांनी मातंग समाज लढाऊ असूनही  त्याला संधी मिळायला नाहीत उच्च शिक्षण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात समाज अजूनही मागे आहे म्हणूनच आत्मसन्मान सामाजिक न्याय व एकाच्या उद्देशाने ही प्रसिद्ध आयोजित करण्यात येत आहे आम्ही कोडोली हुपरी रांगोळी इंगळी तळंदगे  परिसरातून  मोठ्या संख्येने ह्या परिषदेत हजर राहणार आहोत

 या कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्ते महेश बिरांजे यांनी सांगितले की आता आम्ही मांग महार भेद न माता एकत्र येणार आहोत मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून समाज एकाचे प्रतीक बनवणार आहोत ही परिषद म्हणजे त्या एकतेची सुरुवात आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या संपूर्ण राज्याला पारंपरिक वाद्याच्या गजरात एकतेचा संदेश दिला जाणार आहे असे त्यांनी सांगितले 

 या कार्यक्रमास आर पी आय आयटी सेल्स  चे जिल्हाध्यक्ष बाबासो कांबळे हातकणंगले तालुका उपाध्यक्ष  अनिल कांबळे आणि इतर समाजातील थोर मोठे आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते 

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल बिरांजी यांनी केले व सर्व उपस्थित मान्यवरांचे त्यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी मातंग समाजातील युवक माता भगिनी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.