जयसिंगपूर घरफोडीतील चोरटे पोलिसांनी घेतले बारा तासाच्या आत ताब्यात.

 जयसिंगपूर घरफोडीतील चोरटे पोलिसांनी घेतले बारा तासाच्या आत ताब्यात. 

-----------------------------------

नामदेव भोसले


जयसिंगपूर प्रतिनिधी

-----------------------------------




संशियताकडून 48 तोळे वजनाचे हिरे मोती रत्न जडीत सोन्याचे  50 लाख 70 हजार रुपये किमतीचे दागिने  पोलिसाकडून जप्त.

जयसिंगपूर येथे 22 मे रोजी भगवान राजाराम बियाणी यांच्या गल्ली नंबर 5 येथल राहत्या घरी चोरी झाली होती यामध्ये 40 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोने हिरे व मोत्याचे दागिने चोरून नेले होते याबाबतची फिर्याद भगवान राजाराम बियाणी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली होती या अनुषंगाने जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील तपासात बारा तासाच्या आत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन 50 लाख 70 हजार रुपयांचे सोने, हिरे, मोत्याचे दागिने जप्त केले आहेत.

   22 मे रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भगवान बियाणी राहणार पाचवी गल्ली राधाबाई रोड जयसिंगपूर यांच्या घरातील वरील खोलीत लाकडी कपाट उचकटून त्यातील 40 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोने , हिरे ,मोती असा मुद्देमाल चोरला होता. फिर्यादीने परत जयसिंगपूर पोलिसांना दिलेल्या जबाबात 56 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची तक्रार दाखल केली आहे. जयसिंगपूर पोलीस गुन्ह्याचा तपास करीत असताना फिर्यादी यांच्या घरात काम करीत असणाऱ्या कामगाराबाबत संशय निर्माण केला होता. बियाणी यांच्या घरी काम करणारी महिला संतोषबाई मदनलाल प्रजापत वय 54 वर्षे मुळगाव मध्य प्रदेश सध्या राहणार आठवी गल्ली जयसिंगपूर याला ताब्यात घेऊन चोरीच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदरची चोरी त्याच्यासोबत काम करणारा घर कामगार विनायक मलगोंडा पाटील  मुळगाव मिरज मालगाव रोड भोकरे प्लॉट सुभाष नगर सध्या राहणार गल्ली नंबर 8 जयसिंगपूर या दोघांनी संगनमत करून महिला कामगार संतोषबाई  प्रजापत यांनी विनायक पाटील यास इलेक्ट्रिक ग्राइंडर कटर मशीन आणून दिले व दुसऱ्या मजल्यावरील खोलीचे गज कापुन कोणीतरी चोरट्याने चोरी केली असल्याचा बनाव केला. जयसिंगपूर पोलिसांनी पॉलिसी खाक्या दाखवल्यानंतर संतोषबाई प्रजापत व विनायक पाटील यांनी खोलीतील सोने,हिरे, मोत्याचे दागिने चोरी केले असल्याची कबुली दिली आहे.

आरोपीने गुन्ह्याची दिले कबुली प्रमाणे 50 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोने हिरे व मोत्याची दागिने पंचनामे द्वारे आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनूस इनामदार हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.