माझी लेक लाखात एक मुलगी ओवीच्या स्मरणार्थ सागर पुजारी यांचा उपक्रम.अहिल्यादेवींच्या जयंती दिनी प्रारंभ.

 माझी लेक लाखात एक मुलगी ओवीच्या स्मरणार्थ सागर पुजारी यांचा उपक्रम.अहिल्यादेवींच्या जयंती दिनी प्रारंभ.

--------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

--------------------------- 

मुलगी आणि बापाचं जिव्हाळ्याचं नातं पण अचानकपणे मुलगीची एक्झिट झाली तर बापाची काय अवस्था होते. याची कल्पना सुद्धा करवत नाही. परंतु मुलीच्या आठवणी चिरंतरपणे स्मरणात रहाव्यात म्हणून हातकणंगले येथील सागर पुजारी यांनी मुलगी ओवीच्या नव्याने लेक माझी लाखात एक ही योजना राबविण्याचा निर्धार केला आहे. 31 मे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. जन्माला आलेल्या मुलीच्या नावे 3 हजार रुपयेची ठेव ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, पुजारी यांनी नगरपंचायतीला पत्र लिहून शहरातील कोणत्याही मुलगीच्या जन्माची नोंद आपल्या दप्तरी झाल्यास तात्काळ कळवावे, जेणेकरून या योजनेचा लाभ त्या कुटुंबाला देता येईल. असे आवाहन निवेदनातून केले आहे.


सागर पुजारी यांची कन्या ओवी हिचा असाध्य अशा दुर्मिळ sspe या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. शेवटच्याक्षणापर्यंत पुजारी यांनी तिच्या उपचारासाठी प्रयत्न केले. प्रसंगी चीन मधून औषध आणले परंतु त्याचाही परिणाम या आजारावती झालेला नाही. असा कटू प्रसंग कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी भावना पुजारी आणि व्यक्त केली आहे. मुलीचं नेहमीच स्मरण राहावं म्हणून ही योजना हातकणंगले शहर मर्यादित सुरू करत असल्याच त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे शहरवासीयांनी स्वागत केले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.