पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयातर्फे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन वर्गाचे आयोजन.
पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयातर्फे शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन वर्गाचे आयोजन.
---------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
---------------------------------
: उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन वर्गाचे गरज ओळखून पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं खोतवाडी इथं प्रशिक्षण शिबाराचे आयोजन केलयं.शिबीराचे उद्धाटन कुंभी बँकेचे संचालक आनंदराव माने,लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रद्धानंदन रणदिवे,यशवंत खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
विदयार्थ्थांच्या अंगी शिवकालीन युद्ध कला आणि सुसंस्कार अवगत असण्याची नितांत गरज आहे.ही गरज ओळखून पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई जोतिबा फुले वाचनालयातर्फे
शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन वर्गाचे आयोजन करण्यात आलयं
शिबीराचे उद्धाटन कुंभी बँकेचे संचालक आनंदराव माने,लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रद्धानंदन रणदिवे,यशवंत खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान बोलताना युवा पिढी सुधारणेसाठी वाचनालयाची गरज आहे.कोणतीही गोष्ट सहज मिळत नसुन कष्टाला पर्याय नसल्याचे श्रद्धानंद रणदिवे यांनी सांगितले.
शिबिर एक आठवडा सुरू रहाणार असून यामध्ये,दंडपट्टा, लेझीम लाठीकाठी ,भारतीय व्यायाम प्रकार, व्याख्यान आदी गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.
दरम्यान प्रशिक्षक सचिन परीट यांनी शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक विदयार्थ्थांना करुन दाखविली. उपस्थितांना वाचनालयाचे संस्थापक डाॅ.निलेश पाटील यांनी हरिपाठ भेट देऊन भक्तीभाव जपला.
यावेळी अमृतराज रणदिवे,सागर चौगुले, इंद्रजीत शिंदे,विक्रम पाटील,आशिष पाटील, कवी संभाजी चौगले,जयवंत खोत,आनंदा यादव, विनायक खोत,विजय खोत,दगडू गुरवळ, ओंकार रणदिवे, सरदार खोत, तसेच विदयार्थी उपस्थित होते
Comments
Post a Comment