आरोग्य यंत्रणा मंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामीण भागाला डेंगूणे ग्रासले

 आरोग्य यंत्रणा मंत्र्यांच्या दौऱ्यात ग्रामीण भागाला डेंगूणे ग्रासले.

-------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------- 

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कोल्हापूर जिह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेतला असता, ग्रामीण व शहरी भागात डेंग्यू किंवा डेंग्यूसदृश तापाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ऋतू संक्रमणाच्या काळात अनेक घरांमध्ये व्हायरल तापाचे रुग्ण असून, सामान्य तापाच्या प्रत्येक पाच रुग्णांपैकी एक रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले आहे.महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांची घोषणा केली जात असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी जाणवतात.

     परिणामी हातकणंगले तालुक्यात कुंभोज सह परिसरात मोठ्या प्रमाणात डेंगूची रुग्ण आढळत असून सध्या हे डेंगूची रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी शासनाच्या वतीने सदर डेंगू रुग्णांचा सवे करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात यावेत अऐ मागणी सामान्य जनतेतून होत असली तरी, सध्या     आरोग्य व्यवस्था  व शासकीय यंत्रना मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्रिमंडळाच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात मंत्रिमंडळाचे दौरे पाहता शासकीय यंत्रणेला काम करणे अवघड झाले असून एक मंत्री येऊन जातात तर दुसऱ्या दिवशी दुसरे पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त मंत्रिमंडळाचे दौरे या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात होत असल्याचे चित्र दिसत असून मंत्रिमंडळाच्या दौऱ्याला शासकीय यंत्रणे बरोबरच सामान्य जनताही आता कंटाळली असल्याचे पाहावयास मिळत आहे. 

   परिणामी ग्रामीण भागातील डेंगू यंत्रणा सक्रिय करून त्यावरती उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा अशी ही मागणी सर्वसामान्य जनतेतून होत असून डेंगूच्या डासांच्या पासून मुक्तता मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीने औषध फवारणी करावी अशी ही मागणी होत आहे.विनोद शिंगे कुंभोज

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.