कोल्हापूर विमानतळावर प्रगतीचे नवीन पंख.
कोल्हापूर विमानतळावर प्रगतीचे नवीन पंख.
-------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
--------------------------
कोल्हापूर विमानतळासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते,नवीन ATC टॉवर, तांत्रिक ब्लॉक, आणि अग्निशमन केंद्र यांचे लोकार्पण करण्यात आले. त्याचप्रमाणे स्टार एअरच्या कोल्हापूर–नागपूर विमानसेवेचा देखील शुभारंभ झाला.ही घडामोड केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या प्रगतीस चालना देणारी आहे. कोल्हापूर ते नागपूर हे अंतर आता अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
या प्रसंगी खासदार श्रीमंत शाहू महाराज, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने बापू, जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच अन्य मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment