मुरगूडमधे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई.
मुरगूडमधे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई.
-----------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
-----------------------------------
मुरगूड कुरणी रोडवरील दत्तप्रसाद मंगल कार्यालय येथे नदी पर्यंत असणाऱ्या ओढा आणि नाल्यांची स्वच्छता नगरपालिका प्रशासनाने करून घेतली त्यांना मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त यांनी हातभार लावला . पावसाळ्यामध्ये या भागात मोठ्या प्रमाणात पूर येतो या भागात असलेले नाले तुंबून आणि ओढ्यात कचरा साठल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा तुंब होऊन पूर परिस्थिती आणखीन भीषण होते या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता तब्बल दोन टनाहून अधिक कचरा काढण्यात आला यामध्ये चौगुले गल्ली ते दत्त मंदिर येथील नाल्यांचा देखील समावेश होता शिवभक्त समाजसेवक यांनी सोशल मीडियावर स्वच्छतेसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून लोक एकत्र आल्यानंतर नगरपालिका प्रशासन यांनी जेसीबीच्या साह्याने नाले स्वच्छता सुरुवात करण्यात केली तब्बल सहा तास स्वच्छता मोहीम चालली . मध्यंतरी मुरगूड मधील समाजसेवक यांनी मुरगुड चे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्याकडे या नाले स्वच्छतेबद्दल मागणी केली होती त्यानुसार आज समाजसेवक आणि नगरपालिका प्रशासन यांनी मिळून ही नाले आणि स्वच्छ करून घेतला यावेळी मुरगुड नगरपालिका स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले ,शिवभक्त सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, ओंकार पोतदार , नगरपालिका कर्मचारी अक्षय कांबळे, भिकाजी कांबळे , कृष्णात कांबळे स्वच्छता मुकादम बबन बारदेस्कर, तानाजी भराडे उदय पाटील. बाजीराव लाड. सुखदेव चव्हाण सौरभ मोरे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment