गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी दि न्यू इंग्लिश स्कूलचा प्रेरणादायी उपक्रम.
गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी दि न्यू इंग्लिश स्कूलचा प्रेरणादायी उपक्रम.
------------------------------------
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
------------------------------------
चंदगड:-
एस . एस . सी परीक्षेचा निकाल
नुकताच लागला. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुणी डीजीटल बॅनर लावून ,कुणी दूरध्वनीद्वारे, तर कुणी प्रत्यक्ष भेटून, कुणी पेढा भरवून, तर कुणी पुष्पगुच्छ देऊन, तर कुणी फटाक्यांची माळ लावून आपापल्या पद्धतीने यशोत्सव साजरा केला.
खेडूत शिक्षण मंडळ
संचालित दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड चे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मात्र गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीव लक्षात घेऊन यापुढील अडचणी
आणि त्या निवारण करण्याचा शब्द देऊन तसेच उज्ज्वल यशाबद्दल पेढा भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन पालकांसह यथोचित सन्मान केला. दि न्यू इंग्लिश स्कूलचे गुणवंत विद्यार्थी
कु .श्रावणी महादेव कोपार्डे ,स्वरा विनायक पिळणकर ,कार्तिक संदीप निट्टूरकर ,आर्या भालचंद्र मोहिते ,आर्या अनिल गावडे
आदिती सुरेश भदरगे , गौतमी प्रशांत वाडकर , आदिती भरमू मेंगुलकर , कार्तिकी निवृत्ती खळणेकर , आरती महादेव टक्केकर , संस्कृती सचिन वाके , उत्कर्ष शशिकांत कुंभार
हे सर्व गुणवंत विद्यार्थी सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील आहेत. परिस्थितीशी झगडून या सर्वांनी धवल यश मिळवले आहे. त्यांच्या घरी जाऊन प्राचार्य आर. पी पाटील व टी .व्ही खंदाळे , संजय साबळे , सचिन शिंदे , सागर कुंभार आदि
सहकारी शिक्षकांनी
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि पालकांच्या प्रोत्साहनाचे कौतुक केले.
गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी झाल्याने चंदगड परिसरामध्ये या प्रेरणादायी उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले आणि शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शालेय समिती चेअरमन प्रा एन.एस . पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले .
संजय साबळे , टी . व्ही. खंदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील करिअरसंबंधी मार्गदर्शन केले, तसेच कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी शाळा यापुढेही कटिबद्ध असल्याचे सांगितले. या उपक्रमाने विद्यार्थीही भारावून गेले.
एकूणच गुणवंतांच्या दारी शिक्षकांची वारी हा दि न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम प्रेरणादायी ठरला, यात शंका नाही. शैक्षणिक वर्तुळामध्येही या उपक्रमाचे कौतुक होत आहे .
Comments
Post a Comment