गांधीनगर परिसरातील कुप्रसिध्द बाल्या गँगचे चौघेजण कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार.
गांधीनगर परिसरातील कुप्रसिध्द बाल्या गँगचे चौघेजण कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार.
-----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार .
-----------------------------
गांधीनगर (ता. करवीर) परिसरात असलेल्या बाल्या गँगच्या प्रशांत उर्फ बाल्या अर्जुन मिसाळ (रा. ११८/३०, गांधीनगर), वेदांग शिवराज पोवार (रा. सी वॉर्ड, यशवंत कृपा बिल्डिंग, बिंदू चौक, कोल्हापूर), महेश दुर्गा माने (रा. मोहिते कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) आणि अक्षय दिपकलाल चावला (१५५/९स शिरु चौक, गांधीनगर) या चौघांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले. या टोळीने निर्माण केलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सामाजिक स्वास्थ्य पुनःप्रस्थापित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलीसांनी सांगितले की, गांधीनगर परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधा आणणारे गुन्हे करत असलेल्या बाल्या गँगच्या हद्दपारीचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर इचलकरंजीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचकडून त्या प्रस्तावाची निःपक्षपाती चौकशी करण्यात आली. वेळोवेळी झालेल्या सुनावणीत टोळीप्रमुख आणि टोळीतील सदस्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. या टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्यावर दोन वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली. हद्दपार केलेले इसम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास त्यांनी गांधीनगर पोलीसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
Comments
Post a Comment