Posts

Showing posts from July, 2025

राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे:"सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी".

Image
  राजापूरमधील पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय करण्यात यावे:"सदाभाऊ खोत यांची पावसाळी अधिवेशनात मागणी". ---------------------------------  राजापूर प्रतिनिधी तुषार पाचलकर  ----------------------------------  राजापूर तालुक्याच्या प्रशासनिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधानभवनात पुढे आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ‘अप्पर तहसील कार्यालय’ सुरू करण्याची मागणी केली. राजापूर तालुका मोठ्या भूभागावर विस्तारलेला असून, अनेक दुर्गम गावांमुळे नागरिकांना तहसील कार्यालयाच्या सेवांसाठी लांबचा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अप्पर तहसील कार्यालय उभारल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम होईल आणि सामान्य जनतेला सोयीच्या सेवा मिळतील, असा मुद्दा श्री. खोत यांनी अधिवेशनात मांडला. ते म्हणाले, “राजापूरमधील जनतेला शासकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची नितांत आवश्यकता आहे. ही मागणी लवकरच मान्य होऊन निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा आहे.” या माग...

विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निकालाचा थरार.

Image
  विद्यार्थ्यांनी अनुभवला लोकशाहीचा उत्सव दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये डिजिटल निकालाचा थरार. -------------------------------- चंदगड प्रतिनिधी  आशिष पाटील  -------------------------------- चंदगड : दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे शालेय मंत्रीमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. खेडूत शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ही निवडणूक गुप्त मतदान प्रणालीद्वारे घेण्यात आली. विशेष म्हणजे मतमोजणी डिजिटल पद्धतीने स्क्रीनवर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहण्याची उत्सुकता आणि थरार द्विगुणित झाला. डिजिटल बोर्डवर जाहीर झालेल्या निकालामुळे प्रत्येक मतानंतर निकालात होत असलेले बदल विद्यार्थ्यांसाठी नवीन अनुभव ठरले. निकाल समोर येताच शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या मंत्रीमंडळाची प्रथम कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी काही ठोस निर्णय घेत धडाकेबाज सुरुवात केली. नवीन कॅबिनेट मंत्रीमंडळ याप्रमाणे:  मुख्यमंत्री: ओमकार हरिष जाधव उपमुख्यमंत्री: प्रणय भैरू कांबळे विद्यार्थिनी प्रतिनिधी: कु. सृष्टी शाहू गाव...

जुन्या पेन्शन साठी राधानगरी तालुक्यातून शेकडो शिक्षक कर्मचारी मुबईला जाणार.

Image
  जुन्या पेन्शन साठी राधानगरी तालुक्यातून शेकडो शिक्षक कर्मचारी मुबईला जाणार.   --------------------------------  राधानगरी प्रतिनिधी   विजय बकरे --------------------------------  2005 पूर्वी नियुक्ती असूनही शिक्षण क्षेत्रातील 26 हजार कर्मचाऱ्यांच्यावर जुनी पेन्शन योजना न मिळाल्याने अन्याय होत आहे. निवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या वर बेकारीची कुऱ्हाड तयार झाली आहे. यासाठी येत्या काही दिवसात मुंबई येथील आझाद मैदानावर जलसमाधी आंदोलनासाठी शेकडो कर्मचारी राधानगरी तालुक्यातून जाणार असल्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.  नरतवडे तालुका राधानगरी येथे जुनी पेन्शन कोअर कमिटी व शिक्षण संघर्ष समिती यांच्यावतीने राधानगरी तालुका स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला यावेळी प्रमुख उपस्थिती जुनी पेन्शन कोर कमिटीचे राज्य कार्याध्यक्ष सुदेश जाधव होते अध्यक्षस्थनी राहूल पाटील होते . स्वागत शिक्षक सेनेचे अध्यक्ष एम.पाटील यांनी केले.     यावेळी बोलताना जाधव म्हणाले गेली पंधरा वर्षे जुन्या पेन्शन साठी शासन दरबारी...

कोल्हापूर शाहूपुरी परिसरात १.३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक.

Image
  कोल्हापूर  शाहूपुरी परिसरात १.३७ लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक. --------------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी संस्कार तारळेकर --------------------------------- शाहुपुरी  : पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार, अवैध धंदे आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचा धडाका सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ३७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संकपाळ आणि विशाल चौगले यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगरमिल कॉर्नर ते शिये फाटा रोडवरील श्री मंगल कार्यालयाच्या पुढे एक व्यक्ती मोटरसायकलवरून येऊन गांजा विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे, LCB चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकाने १८ जुलै २०२५ रोजी सापळा रचून छापा टाकला. य...

कणेरी येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Image
  कणेरी येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. ---------------------------------------- कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------------  गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील कणेरी येथील श्री. काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची सुमारे १८ वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे नाल्यात कोसळली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या समोरील बाजूने वाहणारा ओढा अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आलेला नाही, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुटलेली संरक्षक भिंत आणि नाल्यातील ही दुर्गंधी यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे पालकांनी शासनाचे आणि स्थानिक प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले आहे. कोसळलेली संरक्षक भिंत लवकरात लवकर दुरुस्त करावी आणि नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर करावी, अशी मागण...

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा राज्यामध्ये चौथ्या क्रमांक.

Image
 स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा राज्यामध्ये चौथ्या क्रमांक. ************************ मुरगूड/ जोतीराम कुंभार ************************ स्वच्छ सर्वेक्षण २०२५ कचरा मुक्त शहर मानांकन व हागणदारी मुक्त शहरामध्ये मुरगूड नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी करुन देशात २०३५ शहरांपैकी २६ वा व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटा मध्ये राज्यात १६३ शहरांपैकी ४ था क्रमांक पटकावुन आपल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये योगदान अभादित केले आहे. म्वच्छ सर्वेक्षण २०२४ २५ मार्च ते २९ मार्च यावेळी फिल्ड असेसमेंट होऊन मुरगूड शहराला १२५०० पैकी १०००१ गुण प्राप्त झाले आहेत. यापुर्वी ही नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियामध्ये उच्चतम कामगिरी केली आहे. यापुढेही स्वच्छ सर्वेक्षण अभियान, कचरा मुक्त शहर अभियान, हागणदारी मुक्त शहर अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये अतिउत्कृष्ट कामगीरी करुन मुरगूड शहराचा देशात अव्वल क्रमांक पटकवण्याचा ध्यास केला आहे. असे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अतिश वाळुंज यांनी सांगितले या अभियानात उच्चतम कामगिरी करण्यासाठी मुरगूड शहरातील सर्व नागरिक, पदाधिकारी, तरुण मंडळे, सफाई कर्मचा...

मुरगूड नगरपरिषदेमध्ये नमस्ते दिन' साजरा

Image
 मुरगूड नगरपरिषदेमध्ये नमस्ते दिन' साजरा. ******************** मुरगूड/ जोतीराम कुंभार *******************  मुरगूड येथे स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड गॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलैला नमस्ते दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सफाई कर्मचा-यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित केली जाते. मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळूज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला. नगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांना सुरक्षेच्या उपकरणांचे महत्व सांगण्यात आले. ड्रेनेज, सेप्टिक टँकची स्वच्छता करणार्या कर्मचा-यांना आरोग्याची काळजी आणि त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. उत्कृष्ट निवड झालेले सफाईमित्र अक्षय कांबळे व अजित कांबळे यांचा सन्मान करून गौरवण्यात आले या वेळी मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश दा. वाळुंज कार्यालय अधिक्षक स्नेहल नरके, आरोग्य विभाग प्रमुख सचिन भोसले, शहर समन्वयक विपुल अपराध, मुकादम बबन बारदेस्कर, भिकाजी कांबळे. व सर्व सफाई कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

दहा वर्षापासून यंत्रणेला देत होता गुंगारा अकोला जिल्ह्यातून अटक.

Image
दहा वर्षापासून यंत्रणेला देत होता गुंगारा अकोला जिल्ह्यातून अटक.  वांटेड दरोडखोर तलवार सिंग राजापेठ पोलिसांकडून ट्रॅप 100 वर गुन्हे दाखल,  ***********************  फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   पी एन देशमुख.   अमरावती जिल्हा प्रतिनिधी.  **********************  अमरावती. शहर आयुक्तलया यासह राज्यातील विविध पोलीस ठाण्यात चोरी राबरी, दरोडा, खून व कोणाचा प्रयत्न असे शेकडो गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात आरोपीला राजापेठ पोलिसांनी अकोल्या जिल्ह्यातील त्याच्या नायगाव या राहत्या घरातून अटक केली. १७ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली अब्दुल रचित उर्फ तलवार सिंग अब्दुल हमीद रा. नायगाव मेहबूबिया मशीद जवळ अकोला असे अटक कुख्याताचे नाव आहे. तलवार सिंग म्हणून गुन्हेगारी जगातात कुप्रसिद्ध असलेला अ. रशीद विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. अलीकडे शहर आयुक्तालय सह वर्धा,, चंद्रपूर, वर्धा यवतमाळ, नागपूर, व रेल्वे पोलीस त्याच्या मार्गावर होते. त्याच्याविरुद्ध शेकडोच्या संख्येने गुन्हे दाखल असल्याने तो दहा वर्षापासून न्यायालयीन तारखेवर देखी...

अमरावती जिल्ह्यातील सीईओचा भातकुली तालुक्यात धडक.

Image
 अमरावती जिल्ह्यातील सीईओचा भातकुली तालुक्यात धडक. ********************* फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र पीएन देशमुख.  *********************  दौरा : शाळा, दवाखान्याची पाहणी कुठे कर्मचाऱ्यांच्या कान पिचक्या, काही ठिकाणी कौतुकाची थाप.  फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र पीएन देशमुख.   अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( भातकुली ) अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता महापात्र यांनी आज बुधवारी भातकुली तालुक्यातील काही गावातील शाळा, अंगणवाडी अंगणवाडी व दवाखान्यात भेट देत येथील साधना सामग्री मनुष्यबळाचा आढावा घेतला.शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची त्यांनी संवाद साधला सी इ ओ संजीता महापात्र यांनि बुधवारी पाहणी केली ही अचानक दिलेल्या भेटी दरम्यान त्य काही ठिकाणी शिक्षण डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या उनिवाही स्पष्ट झाल्या होते.त्या अनुषंगाने सीईओ यांनी त्या त्या विभाग प्रमुख यांना योग्य ते निर्देशही दिले या दौऱ्यात त्यांनी लोणी येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच रायपूर पांढरी येथील पुनर्वसन परिसरातील शाळा व ...

शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस ओबीसी न्याय महासंमेलनाचे आयोजन

Image
 शुक्रवारी दिल्लीत काँग्रेस ओबीसी न्याय महासंमेलनाचे आयोजन. महाराष्ट्र प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांची माहिती **************** इस्लामपूर  प्रतिनिधी  *****************           शोषित, वंचित, गरजू आणि मागासवर्गीय समाजाच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवण्यासाठी काँग्रेस ओबीसी नेतृत्वाच्यावतीने काँग्रेस ओबीसी नेतृत्वाचा भागीदारी न्याय महासंमेलन आयोजित करण्यात येत आहे.हे महासंमेलन शुक्रवार २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता तालकटोरा स्टेडियम, दिल्ली येथे होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांनी दिली.         नंदकुमार कुंभार म्हणाले , दिल्ली येथे होणाऱ्या महासंमेलनात राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे , लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. राहुल गांधी यांनी सांगितले की "ज्याची जितकी संख्या, त्याची तितकी भागीदारी" सुनिश्चित केली जाईल. जातीय जनगणना केली जाईल; तसेच सुप्रीम कोर्टाच्या इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवून ती वाढवण्याच...

कृष्णाई चषक 2025 चा विजेता ठरला सातारचा अनिकेत बापट.

Image
टक्के शश कृष्णाई चषक 2025 चा विजेता ठरला सातारचा अनिकेत बापट. **************** वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे **************** दि :- 17 जुलै 2025, वाई शहर :- *स्वच्छ सर्वेक्षण 2025 व माझी वसुंधरा अभियान 6.0, वाई नगरपरिषद, वाई अंतर्गत केया युथ संस्था आयोजित श्री बुद्धिबळ क्लब यांच्या संयुक्त सहकार्यातून भव्य राज्यस्तरीय खुल्या जलदगती एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धा श्री कृष्णाबाई संस्थान घाट धर्मपुरी, वाई येथे भरवण्यात आल्या. या स्पर्धेत वाई, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, पुणे, बारामती, पांचगणी, महाबळेश्वर, शिरवळ, लोणंद, मुंबई या ठिकाणाहून 380 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.* *या स्पर्धेत 51 आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी, 19 वर्षावरील महिला, दिव्यांग खेळाडू तसेच 55 वर्षावरील खेळाडू सहभागी झाले होते.* *दीड वर्षाच्या वाईच्या ओजस गवळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.* *अत्यंत चुरशीच्या झालेल्या आठव्या सामन्यात सातारच्या अनिकेत बापटने सर्वोत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन करत कोल्हापूरच्या श्रीराज भोसलेचा पराभव करत कृष्णाई चषक 2025 चे विजेतेपद पटाकावले.* व *कोल्हापूरचा श्रीराज भोसले उपविजेता व मिरजचा मुदस्सर पटेलने तीस...

घोटवडे येथील दोन दूध संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न.

Image
 घोटवडे येथील दोन दूध संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न. *********************** राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे ************************  राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवरील घोटवडे (ता. राधानगरी) येथे चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. हनुमान दूध संस्था आणि स्वयंभू विकास सहकारी संस्था या दोन सहकारी संस्थांच्या इमारतींना लक्ष्य करत चोरट्यांनी शटरची कुलूपे तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी, जाताना त्यांनी काही मुद्देमाल लंपास केला. हनुमान दूध संस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे साहित्य आणि स्वयंभू दूध संस्थेतील रोख दहा हजार रुपये असा एकूण वीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीही या परिसरात चोरट्यांनी बंद घरे, सहकारी संस्थांच्या इमारती आणि ज्वेलर्सची दुकाने लक्ष्य करत मोठी चोरी केली होती. आता पुन्हा सहकारी संस्थांना लक्ष्य केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय.

Image
 राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. *****************************  मिरज तालुका :- प्रतिनिधी राजू कदम  ****************************** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे ऊर्जा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले की, महावितरणला सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्यात यावे. ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज मिळू शकते, त्यामुळे वित्त विभागाने ऊर्जा विभागाकडून आलेल्या प्रस्तावांमधील सर्व बाबी तपासून आवश्यक निधी वेळेत वितरीत करावा. महावितरणला मंजूर झालेल्या आर्थिक वर्षाच्या निधी आणि प्रत्यक्ष दिल्या गेलेल्या निधीमध्ये तफावत निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आवश्यकतेनुसार नियमांमध्ये योग्य बदल करून राज्यातील वीज वितरण व्यवस्थेची आर्थिक स्थिती बळकट करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि पीएम कुसु...

बैलगाडी झाली कालबाह्य.

Image
बैलगाडी झाली कालबाह्य. ........................................................  लेखक.श्री. तानाजी सखाराम कांबळे. ...........................................................  बदल हा निसर्गाने घालून दिलेला एक जन्मजात अधिकार आहे.आणि तो प्रत्येक माणसाने स्वीकारलेला आहे. बदलत्या काळाच्या ओघात माणूस,इतका बदलत गेला की, त्याचं बोलणं चालणं वागणं निसर्गाच्या प्रदुषणाच्या बाजूने, इतकं वाढलं की,कोरोना सारख्या संकटाच्या महामारी च्या काळात माणसाला घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल झालेला आहे.या पाठीमागे जरी अनेक कारणे असली तरी, गरीब शेतकऱ्यांची बैलगाडी,गरीबाची गाडी म्हणून असलेली ओळख एकविसाव्या शतकामध्ये आता  फार कमी प्रमाणात दिसू लागले आहेत. निसर्गातील पर्यावरणाला वातावरणाला पूरक आणि पोषक अशी असणारी,अपघाताला फार कमी निमंत्रण देणारे,शेतकऱ्याची,बळीराजाची,गरीबाची बैलगाडी आता कालबाह्य होत चाललेली आहे.तिचं दर्शन आता खूप दुर्मिळ प्रमाणात होत चाललेल आहे.एक काळ होता ज्यावेळी शटर बंद टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट दूरदर्शनच्या प्रत्येक गावातील एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी असायचे व त्याचे घर गावातील लो...

राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय!

Image
 राज्यातील वीज वितरण व्यवस्था आणि सामान्य वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय! -------------------------------   मिरज तालुका  प्रतिनिधी  राजू कदम  -------------------------------  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे ऊर्जा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट निर्देश दिले की, महावितरणला सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्यात यावे. ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज मिळू शकते, त्यामुळे वित्त विभागाने ऊर्जा विभागाकडून आलेल्या प्रस्तावांमधील सर्व बाबी तपासून आवश्यक निधी वेळेत वितरीत करावा. महावितरणला मंजूर झालेल्या आर्थिक वर्षाच्या निधी आणि प्रत्यक्ष दिल्या गेलेल्या निधीमध्ये तफावत निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. आवश्यकतेनुसार नियमांमध्ये योग्य बदल करून राज्यातील वीज वितरण व्यवस्थेची आर्थिक स्थिती बळकट करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्री बळीराजा मोफत...

धुळे येथे उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार!

Image
  धुळे येथे उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार! -------------------------------   मिरज तालुका  प्रतिनिधी  राजू कदम -------------------------------  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत दिलेले निर्देश -   धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि लॉजिस्टिक दृष्टिकोनातून व्यवहार्यता तपासून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कार्यवाहीस गती द्यावी. धुळे येथे उद्योगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.  देवपूर, वलवाडी आणि सखल भागांतील पावसाचे पाणी निचरा होईल, यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधावा. शहराच्या विस्तारानुसार डीआय (डक्टाइल आयर्न) पाईपलाईन टाकणे, औद्योगिक प्रकल्पांसाठी सौर प्रकल्प बॅटरी स्टोरेजसह उभारणे, तसेच भुयारी मलनि:स्सारण योजनेसाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची प्रक्रिया तात...

शिरसे एसटी स्टँडजवळ कारला भीषण आग.

Image
  शिरसे एसटी स्टँडजवळ  कारला भीषण आग. --------------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------  शिरसे, ता. राधानगरी: येथील एसटी स्टँड परिसरात काल (गुरुवारी) रात्री सात वाजण्याच्या सुमारास सर्व्हिसिंग ला घेऊन जात असताना मारुती ८०० कारला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसे येथील एका सर्व्हिस सेंटरशेजारी दुरुस्तीसाठी आणलेल्या मारुती ८०० कारमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागताच चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीतून उडी मारल्याने तो सुरक्षित बचावला. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन  पथका च्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी शॉर्ट सर्किट हे प्राथमिक कारण मानले जात आहे. या आगीत कारचे मोठे नुकस...

२००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे सकारात्मक पत्र मिळण्यासाठी निवेदन.

Image
  २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचे सकारात्मक पत्र मिळण्यासाठी निवेदन. -----------------------------------  कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------  जुनी पेन्शन मिळावी यासाठी गेली १४वर्षे पाठपुरावा २००५ पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षक कर्मचारी जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने करत आहेत. यासाठी शिक्षक आमदार ही विधासभेत प्रयत्न करत आहेत. शिक्षण मंत्र्यांनी नुकतेच २००५ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी शासनातर्फे सकारात्मक म्हणणे सादर केले आहे असे म्हटले होते  ते पत्र शासनाने कर्मचाऱ्यांना द्यावे यासाठी कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल एडगे , माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकां   जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.  निवेदनाचा आशय असा शिक्षण क्षेत्रामद्ये विनाअनुदानित शाळेत २००५ पूर्वी अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिक्षण विभाग व्यक्तिरिक्त सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना १९८...

तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी.

Image
  तोतया पत्रकार, पोलिस भरारी पथक वसूल करत होते खंडणी.  एक महिलेसह तिघांची टोळी जेरबंद , साकोलीचे दोन आरोपी अटकेत. चौथा साकोलीचा आरोपी सोनवाने फरार , १३ लाखांचा मुद्देमाल जप्त. संजीव भांबोरे भंडारा - पोलीस व पत्रकार असल्याचे भासवून नागरिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश करत मूल पोलिसांनी तीन खंडणीखोरांना अटक केली आहे. या आरोपींनी पोलिस आणि पत्रकार असल्याची बतावणी करून नागरिकांना धमकावून पैसे उकळले होते. पोलिसांनी या आरोपींकडून एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौथ्या आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.               दिनांक ३ जुलै २०२५ रोजी फिर्यादी सुरेश लक्ष्मण गणमेनवार वय ३६, रा. चिरोली यांच्या घरी एक पांढऱ्या रंगाची अर्टीका कार क्र. एम एच ३४ सीजे ५८२४ येऊन त्यामधील चार जणांनी स्वतःला पोलीस भरारी पथक व पत्रकार चंद्रपूर येथील अधिकारी असल्याचे भासवले. विनापरवाना दारु साठा असल्याच्या कारणावरून कारवाईची धमकी देत त्यांनी फिर्यादीकडून तडजोडीअंती १०,००० रुपये खंडणी उकळली. त्यानंतर याच टोळीने मौजा डोंगरगाव य...

शहरातून ७ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन; नागरिकांचा महापालिकेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

Image
 शहरातून ७ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन; नागरिकांचा महापालिकेच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूर, दि. 16 : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने आज शहरभरातून ७ टन वापरात नसलेल्या वस्तूंचे संकलन करण्यात आले. या विशेष उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर तसेच सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या देखरेखीखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.             या मोहिमेअंतर्गत आज घराघरातून जुने कपडे, उशा-गाद्या, खराब इलेक्ट्रीक वस्तू, बॅग, पर्स, ट्यूबलाईट, बल्ब, कालबाह्य औषधे, शुज, काच, लाकडी फर्निचर, टीव्ही, टप, चटया, सोफा सेट, तेलाचे डबे आदी वस्तू संकलित करण्यात आल्या. महापालिकेच्या घंटागाड्या व टिप्परद्वारे संपूर्ण शहरातून हे संकलन करण्यात आले.             महापालिकेका ही मोहीम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांनी अशा टाकाऊ वस्तू उघड्यावर किंवा रस्त्यावर न टाकता थेट प्रभागातील घंटागाडीकडे सुपू...

एमपीतील स्वस्त दारूची "विदेशी बाटलीतून विक्री : गुन्हे शाखेने 3 लाख १४ हजाराची दारू जप्त.

Image
  एमपीतील स्वस्त दारूची "विदेशी बाटलीतून विक्री : गुन्हे शाखेने 3 लाख १४ हजाराची दारू जप्त.  ----------------------------------------  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. पी. एन.देशमुख.     ----------------------------------------                                       अमरावती.                                        मध्य प्रदेशात मिळणारी स्वस्त दारू महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आणायची व ही दारू महागड्या इंग्रजी दारूच्या बाटल्या मध्ये भरायची आणि शहर व जिल्ह्यात विक्री करायचे हा गोरख धंदा मागील काही दिवसापासून अमरावती शहरात सुरू होता दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी वाटर रिफीलीग गोदामावर धाड टाकून ३ लाख १४ हजाराची दारू जप्त करून हा गोरख धंदा उघड केला यावेळी दोघांना ताब्यात घेतले आहे. राज सुनील शाहू वय  ३५ मस्तानगंज अमरावती व गौरव ...

महापालिकेची जनावरांवरील कारवाई सुरू दोन जनावरे जप्त करून पांजरपोळ संस्थेकडे सुपूर्द.

Image
 महापालिकेची जनावरांवरील कारवाई सुरू दोन जनावरे जप्त करून पांजरपोळ संस्थेकडे सुपूर्द. संस्कार कुंभार. -------------------- कोल्हापूर, दि. 16 : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी भटकणाऱ्या पाळीव आणि भटक्या जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज महापालिकेच्या पथकाने या मोहिमेअंतर्गत शहरातील दोन जनावरे जप्त केली. ही जनावरे काटेभोगाव येथील पांजरपोळ संस्थेकडे पाठविण्यात आली आहे.             प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीला आळा बसावा यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 335 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे. नागरीकांनी आपल्या पाळीव जनावरांना मोकाट सोडू नये, अशा मोकाट जनावरे सोडणा-यावर महापालिकेच्यावतीने जनावरे जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे शनिवारी किंवा रविवारी खुले होण्याची शक्यता.

Image
  राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे शनिवारी किंवा रविवारी खुले होण्याची शक्यता. ------------------------------------  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------  राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरण भरण्यास फक्त पाच फूट पाण्याची कमतरता असून धरण परिसरात 74 मिलिमीटर पाऊस झाला असून स्वयंचलित सात दरवाज्याजवळ पाणी लागले  असल्याची माहिती जलसंपदा खात्याकडून देण्यात आली पश्चिम भागात गेली पाच  दिवस पावसात जोर कमी झाला होता पण सोमवारी पासून पावसाचा जोर वाढला पण काल मंगळवार पासून पावसाचा जोर ओसरू लागला असल्याने  राधानगरी धरण  बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 74 मिलिमीटर पाऊस झाला असून धरण भरण्यास पाच फूट कमी असले तरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजवळ पाणी लागले असल्याने स्वयंचलित दरवाजे लवकर उघडण्याची शक्यता जलसंपदा विभाग कडून सांगण्यात येत आहे  धरणाची पाणी पातळी 342. 16 फूट इतकी असून पाणीसाठा सात पॉईंट 36 टीएमसी इतका आहे तर बी ओ टी मधून 1600 क्यूसेक व सेवा द्वारे 1500 क्युसेक एकूण 3100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून बुधवारी ...

राजापुरातील पाचल उपसरपंचाची मुजोरगिरी! ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात."शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप,पोलिसात तक्रार"

Image
  राजापुरातील पाचल उपसरपंचाची मुजोरगिरी! ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात."शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप,पोलिसात तक्रार" ---------------------------------- रत्नागिरी प्रतिनिधी  तुषार पाचलकर ---------------------------------- रत्नागिरी जिल्ह्यातील स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त पाचल ग्रामपंचायतीमध्ये काल (१४ जुलै) सकाळी गंभीर प्रकार घडला. उपसरपंच आत्माराम सुतार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी सुभाष काळे यांना कानशिलात लगावली तसेच अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात सुभाष काळे यांनी पाचल ग्रामपंचायत व राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुभाष काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जुलै रोजी सकाळी ते कार्यालयात हजर असताना स्ट्रीट लाईट संदर्भात उपसरपंचांशी चर्चा सुरू होती. या वेळी  शिव्या का दिल्या ही विचारणा केली असता उपसरपंच आत्माराम सुतार यांनी अचानक त्यांना कानाखाली लगावली व अश्लील भाषेत शिवीगाळ केली. यावेळी कार्यालयात इतर कर्मचारीही उपस्थित होते. तक्रारीमध्ये असेही नमूद आहे की, १२ जुलै रोजी संध्याकाळी साडेप...

लोहा पालिकेवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोर्चा धडकला ; महिलांचा लक्षणीय सहभाग.

Image
  लोहा पालिकेवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा मोर्चा धडकला ; महिलांचा लक्षणीय सहभाग. ------------------------------------ लोहा प्रतिनीधी  अंबादास पवार  ------------------------------------                  शहरातील नागरिकांना स्वच्छता, साफसफाई पाणी पुरवठा घरकुल योजनेसह इतर मुलभूत सोयी सुविधा देण्यात याव्या यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा भव्य मोर्चा मंगळवारी लोहा पालिकेवर धडकला मोर्चात हजारोंची उपस्थिती होती. मोर्चातील महिलांचा लक्षणीय सहभाग सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.             भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोहा पालिकेला मोर्चा काढण्याचा इशारा पूर्वीच निवेदनाद्वारे दिला होता. पालिकेकडून मोर्चा काढण्यात येऊ नये अशी विनंती काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना दिली होती. सोमवारी मुख्याधिकारी यांच्या दालनात काँग्रेसचे प्रमुख नेत्यांसोबत चर्चाही झाली मात्र बैठक निष्फळ झाल्याने मंगळवारी काँग्रेस पक्षाचा हजारोंचा मोर्चा पालिकेवर काढण्यात आला. प्रारंभी जुना लोहा येथील छत्...

नूतन पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मुंबईत घेतली भेट.

Image
  नूतन पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मुंबईत घेतली भेट. --------------------------------- नांदेड जिल्हा प्रतिनिधी. अबांदास पवार  --------------------------------- नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आज आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले आहेत.  राष्ट्रवादीचे नेते तथा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई सुभाष या वसंत नगर येथील निवासस्थानी दिनांक 13 जुलै रोजी जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीनंतर आज प्रथमच नवनियुक्त पदाधिकारी यांनी मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली.  या शिष्टमंडळामध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक. माजी आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ.अविनाशराव घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश ...

हिम्मत असेल तर राजेश पवाराणी भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे.

Image
  हिम्मत असेल तर राजेश पवाराणी  भिलारेना बोट लावून दाखवावे _ माधव पाटील पवळे. -------------------------------- नांदेड जिल्हा प्रतिनिधी. अबांदास पवार  -------------------------------- नांदेड: नायगाव विधानसभेचे भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हा उपनिबंधक नांदेड श्री अशोक भिलारे यांना फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिथे राहता तिथे येऊन चड्डी काढून भोंगळ करून मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी कुणबी मराठा समाजाच्या वतीने माधव पाटील पवळे, गणेश पाटील ढगे, अनिल पाटील चिमेगावकर सह काँग्रेसचे श्रावण रापणवाड, संजय वाघमारे यांनी भिलारे यांची भेट घेऊन त्यांचे शाल देऊन स्वागत केले व कुठल्याही प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही  त्यांना दिली. राजेश पवारामध्ये हिम्मत असेल तर भिल्लारे यांना बोट लावून दाखवावे असे आव्हान कुणबी मराठा समाजाच्या वतीने माधव पाटील पवळे यांनी केलेले आहे.    नरसी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासक नेमण्याच्या बाबीवरून नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक यांना अश्लील व खालच्या भाषेत शिवीगाळ केलेली आहे...

सार्वजनिक ठिकाणी आढळणारी जनावरे जप्त होणार.

Image
  सार्वजनिक ठिकाणी आढळणारी जनावरे जप्त होणार. ***************************** संस्कार कुंभार **************************** कोल्हापूर ता.14 : कोल्हापूर शहरात रस्त्यावर भटकणाऱ्या पाळीव आणि भटक्या जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास तसेच सुरक्षिततेस धोका निर्माण होत असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी आढळणारी कोणतीही पाळीव किंवा भटकी जनावरे थेट जप्त केली जाणार असून ती परत देण्यात येणार नाही.  प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीला आळा बसावा यासाठी प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 335 मधील तरतुदींचा आधार घेत महापालिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक अथवा खाजगी परिसरातील जनावरे पकडण्याचा व पकडलेली जनावरे लिलाव करुन त्यापासून मिळणारे उत्पन्न महापालिकेत जमा करणेचा अधिकार महापालिकेस प्राप्त आहे. याबाबत महापालिकेने जाहिर आवाहन प्रसिध्द केले असून नियमांच्या उल्लंघनामुळे पाळीव जनावरांना अन्न-पाणी न पुरवणे, त्यांचा छळ करणे अथवा त्यांना रस्त्यावर सोडणे हे सर्व दंडनीय गुन्हे आहेत. महानगरपालि...

राधानगरी धरण भरण्यास फक्त सात फूट कमी तर 121 मिलिमीटर पाऊस

Image
 राधानगरी धरण भरण्यास फक्त सात फूट कमी तर 121 मिलिमीटर पाऊस. ******************** राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ********************* राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरण भरण्यास सात फूट कमी असून धरण परिसरात 121 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली पश्चिम भागात गेली चार दिवस पावसात जोर कमी झाला होता पण सोमवारी पासून पावसाचा जोर वाढला असल्याने  राधानगरी धरण परिसरात मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत 121 मिलिमीटर पाऊस झाला असून धरण भरण्यास सात फूट कमी असले तरी धरण लवकर भरण्याची शक्यता पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात येत आहे  धरणाची पाणी पातळी 3 40. 46 फूट इतकी असून पाणीसाठा सात पॉईंट 07 टीएमसी इतका आहे तर बी ओ टी मधून 1600 क्यूसेक व सेवा द्वारे 1500 क्युसेक एकूण 3100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून मंगळवारी सकाळी सहा वाजे पर्यंत 121 मिलिमीटर पाऊस झाला तर एक जून ते 15 जुलै अखेर 27 42 मिलिमीटर पाऊस झाला आहे असून धरण 90% टक्के भरले असून भोगावती नदीकडच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याकडून करण्...

श्री सरस्वती विद्यालयात 'माता सन्मान मेळावा' संपन्न.

Image
 श्री सरस्वती विद्यालयात 'माता सन्मान मेळावा' संपन्न. *********************** चंदगड प्रतिनिधी-आशिष पाटील ***********************      कालकुंद्री (ता.चंदगड) येथील सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम दत्ताजी पवार ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवारी (दि. १२ रोजी) सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 'माता सन्मान मेळावा' संपन्न झाला . याप्रसंगी किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयक समस्या व त्यावर उपाय या विषयावर डॉ.संजीवनी संजय तळगुळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महिला पोलीस पाटील संगीता कोळी या उपस्थित होत्या. विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका एल आर तुपारे यांनी महिला सन्मान मेळाव्याचे महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमाला सुप्रिया तेऊरवाडकर, सीमा पाटील, विजया दैठणकर, विद्यालयातील विद्यार्थिनी तसेच कालकुंद्री, किटवाड व कुदनुर येथील विद्यार्थ्यांच्या माता उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन नीता कुंभार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कुमारी सानिका पाटील हिने मांडले.

गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप.

Image
गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप. ************************** चंदगड प्रतिनिधी आशिष पाटील  *************************** ताम्रगड प्रतिष्ठानला चांगल्या गोष्टीचा ध्यास : डॉ अमोल पाटील           कोवाड : ताम्रगड प्रतिष्ठानने गावाशी नाळ जोडलेली माणसे जोडली आहेत. त्यातूनच हे सर्व गावच्या मुलांसाठी काम करत आहेत. अभ्यासिका, मॅरेथॉन, महिला सबलीकरण, मार्गदर्शन केंद्र चालू केले आहे. म्हणूनच ही दैवतुल्य माणसे आहेत. या सेवेचा समाजाला नक्की उपयोग होईल, असे मत अभिनव अकॅडमीचे डॉ. अमोल पाटील यांनी व्यक्त केले. सेवा सहयोग, पुणे व ताम्रगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विध्यमाने तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कुल किट वाटप शनिवारी (दि १२ रोजी) श्रीराम विद्यालय, कोवाड येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस.टी. कदम होते. यावेळी डॉ अमोल पाटील, एन आर पाटील, प्रा.एस.टी. कदम यांच्या हस्ते हायस्कुल, प्राथमिक शाळेतील ४५० विद्यार्थ्यांना स्कुल किट साहित्याचे वाटप केले. तसेच ढोलगरवाडी, किणी, सुंडी, तेऊरवाडी, मांडेदुर्ग, कामेवाडी, डुंडगे, तुर...

भामघर गावचे सरपंच विजय सावले यांची जावळी बँकेवर बिनविरोध निवड

Image
 भामघर गावचे सरपंच विजय सावले यांची जावळी बँकेवर बिनविरोध निवड . ****************** प्रतिनिधी/ शेखर जाधव ****************** सातारा ,जावली :  दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या पोटनिवडणुकीत भामघर गावचे सरपंच, ज्यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केले ते विजय सावले व सह्याद्री नगर चे उदयोजक तुकाराम शिंदे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. ज्यांनी कोरोना कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचऊन केलेल्या आरोग्यसेवेची पोहोचपावती म्हणून विजय सावले याची निवड झालेचे बोलले जातेय. दोन वर्षांपूर्वी जावळीच्या राजकारणातील पितामह, जेष्ठ नेते, वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन बँकेची निवडणूक बिनविरोध केली होती परंतु जावळीची राजधानी मेढा चे सुपुत्र प्रकाश कोकरे व डांगरेघर चे सुपुत्र अरुण सुर्वे याचे आकस्मित निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी पोट निवडणूक लागली. यामध्ये दोन्ही जागा बिनविरोध करणेत मानकुमरे भाऊंना यश आले          नवनिर्वाचित संचालकांचे निवडीबाबत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान बांधकाम मंत्री,...

कुपवाडमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

Image
 कुपवाडमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या . ************************** मिरज तालुका :- प्रतिनिधी राजू कदम *************************** कुपवाड : श्रीमंत कॉलनीतील रहिवासी 35 वर्षीय विकास शामराव मराठे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ही घटना काल दुपारी सुमारास घडली. विकास मराठे यांनी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांचे भाऊ शिवाजी शामराव मराठे यांनी त्यांना तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. या घटनेची नोंद कुपवाड औद्योगिक पोलिसांनी घेतली आहे. मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तजवीज स्वरूपात ठेवण्यात आला असून, आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. कुटुंबीयांचा जबाब आणि वैद्यकीय अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे श्रीमंत कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सहा पोलीस निरीक्...

मुरगूड शहरातील शिवगड मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे स्वागत.

Image
  मुरगूड शहरातील  शिवगड मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे  स्वागत. --------------------------  मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार --------------------------           मुरगूड शहरातील शिवगड या अध्यात्मिक केंद्रामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.     येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांची सज्जनगडावर अनेक प्रवचने झाली आहेत. सज्जनगडावरील शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी मुरगूड येथील  अनेक भाविक  जात असत. याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथर घळी येथे सुद्धा डॉ .देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी  शिबिरे आयोजित केली जात असत.      सज्जनगडावरून आलेल्या स्वामींच्या पादुकांचे स्वागत ,दर्शन व पूजन असा कार्यक्रम शिवगड आध्यात्मिक केंद्रात संपन्न झाला.       डॉ. देशमुख तथा काकाजी हे वार्धक्या मुळे घरीच विश्रांती घेत आहेत.ते स्वामींचे निस्सिम भक्त आहेत. स्वामींच्या पादुका  दर्शनासाठी ...

कणेरीवाडीजवळ महामार्गावर कंटेनर पलटी; मद्यधुंद चालकामुळे अपघात, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

Image
  कणेरीवाडीजवळ महामार्गावर कंटेनर पलटी; मद्यधुंद चालकामुळे अपघात, वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. ---------------------------------------  गोकुळ शिरगाव प्रतिनिधी सलीम शेख ---------------------------------------   पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी परिसरात वैभव हॉटेलजवळ  दुपारी तीन वाजता चेन्नईहून मुंबईकडे दुचाकी घेऊन जाणारा ट्रान्स ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा (MH20 GC 8063) कंटेनर पलटी झाला. चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला बिअर बार दिसल्यानंतर त्याने अचानक रस्ता वळवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात कंटेनरचा तोल जाऊन तो सहापदरीकरणाचे अपूर्ण काम सुरू असलेल्या रस्त्यावर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अपघातानंतरही चालक अशोक हा मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळीच बसून होता. या अपघातामुळे मुख्य वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण झाला नाही, कारण कंटेनर अर्धवट सुरू ...

' सोन्या ' बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी केले उत्तरकार्यासह अन्नदान.

Image
 ' सोन्या ' बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांनी केले उत्तरकार्यासह अन्नदान. ----------------------------------- मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार -----------------------------------          मुरगूड येथील देशमुख कॉलनीत राहणाऱ्या मारूती शंकर चौगले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनलेल्या व त्याच्यावर जिवापाड प्रेम करीत असलेल्या ' सोन्या ' नावाच्या बैलाचा मृत्यू झाला . सारे कुटुंब शोकाकुल झाले . त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी फोटो पूजन व उत्तरकार्य विधीसह अन्नदान करीत शेवट गोड करण्याचा प्रयत्न चौगले कुटुंबीय करीत आहेत . चौगले कुटुंबाचे प्राण्याप्रती असलेल्या प्रेमाबद्दल परिसरातून कौतुक होत आहे .             येथील देशमुख कॉलनीत राहणाऱ्या मारूती शंकर चौगले या शेतकऱ्यांनी १४ वर्षापूर्वी मुरगूडच्या जनावरांच्या बाजारातून बैल खरेदी करून घरी आणला होता . शेती कामासाठी आणलेल्या बैलाचा अल्पावधीतच पत्नी सविता , मुलगी सुप्रिया , मुलगे विघ्नेश व ओंकार यांना लळा लागला . तसे त्याचे सोन्या असे नामकरणही झाले . तसा सोन्या परिसर...

मुरगूड शहरातील शिवगड मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे स्वागत.

Image
  मुरगूड शहरातील शिवगड मध्ये समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे स्वागत. ----------------------------- मुरगूड‌ प्रतिनिधी जोतीराम कुंभार -----------------------------          मुरगूड शहरातील शिवगड या अध्यात्मिक केंद्रामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.     येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांची सज्जनगडावर अनेक प्रवचने झाली आहेत. सज्जनगडावरील शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी मुरगूड येथील अनेक भाविक जात असत. याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथर घळी येथे सुद्धा डॉ .देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी शिबिरे आयोजित केली जात असत.      सज्जनगडावरून आलेल्या स्वामींच्या पादुकांचे स्वागत ,दर्शन व पूजन असा कार्यक्रम शिवगड आध्यात्मिक केंद्रात संपन्न झाला.       डॉ. देशमुख तथा काकाजी हे वार्धक्या मुळे घरीच विश्रांती घेत आहेत.ते स्वामींचे निस्सिम भक्त आहेत. स्वामींच्या पादुका दर्शनासाठी सव्यसाची या त्यांच्या निवासस्थानी नेण्या...

भामघर गावचे सरपंच विजय सावले यांची जावळी बँकेवर बिनविरोध निवड.

Image
  भामघर गावचे सरपंच विजय सावले यांची जावळी बँकेवर बिनविरोध निवड.  ----------------------------------- सातारा जावली प्रतिनिधी  शेखर जाधव  ----------------------------------- दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेच्या पोटनिवडणुकीत भामघर गावचे सरपंच, ज्यांनी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केले ते विजय सावले व सह्याद्री नगर चे उदयोजक तुकाराम शिंदे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. ज्यांनी  कोरोना कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचऊन केलेल्या आरोग्यसेवेची पोहोचपावती म्हणून विजय सावले याची निवड झालेचे बोलले जातेय. दोन वर्षांपूर्वी जावळीच्या राजकारणातील पितामह, जेष्ठ नेते, वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी सर्व पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन बँकेची निवडणूक बिनविरोध केली होती परंतु जावळीची राजधानी मेढा चे सुपुत्र प्रकाश कोकरे व डांगरेघर चे सुपुत्र अरुण सुर्वे याचे आकस्मित निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदासाठी पोट निवडणूक लागली. यामध्ये दोन्ही जागा बिनविरोध करणेत मानकुमरे भाऊंना यश आले          नवनिर्वाचित संचालकांचे निवडीबा...