बँक व्यवस्थापकाच्या घरात अंकलीच्या सरपंचाने केली चोरी राहुल पाटील याला अटक, तत्काळ जामीनही; मुद्देमाल जप्त
बँक व्यवस्थापकाच्या घरात अंकलीच्या सरपंचाने केली चोरी
राहुल पाटील याला अटक, तत्काळ जामीनही; मुद्देमाल जप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~कुपवाड प्रतिनिधी राजु कदम.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांगली, ता. २१: सामान्य जनतेने ज्यांच्या हाती गावाच्या विकासाची आणि सुरक्षेची धुरा सोपवली, तेच जर चोरी करू लागले तर विश्वास ठेवायचा कोणावर? मिरज तालुक्यातील अंकली येथील सरपंच राहुल अनिल पाटील (वय ३६) याने विश्रामबाग परिसरात राहणान्या एका बैंक व्यवस्थापकाच्या घरात चोरी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पाटील याला अटक केल्यानंतर त्याचा तत्काळ जामीनही मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.
राहुल पाटील सीसीटीव्हीमुळे उघडकीस,
एलसीबी पथकाने तपास सुरू करताच काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. चोरीत सरपंच राहुल पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन झाले.
चौकशीत कबुली,
ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. एलसीबीचे सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने मुद्देमालही वसूल केला.
" दरम्यान,या प्रकरणाची पोलखोल पथकाने केली तपास हाती घेतला असून, स्वतःच अधिक माहिती अशी की, विश्रामबाग येथील एसटी कॉल्नीत अश्विन शिवकुमार पिल्ले यांचे घर आहे. पिल्ले हे एका राष्ट्रीयीकृत बँकेत सहायक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ९९ ऑगस्ट रोजी त्यांच्या बंद घरातून तब्बल सहा लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला. याची फिर्याद विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल झाली.
अटक आणि जामीन,
त्याला अटक केली. वैद्यकीय कारणाने त्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे.
आरोपी राहुल अनिल पाटील (वय ३६), सरपंच, आंकली (ता. मिरज)
माहिती उशिरा का?
या घटनेला तीन दिवस झाले, मात्र याबाबतची माहिती माध्यमांना उशिरा देण्यात आली. एकूणच या घटनेमुाळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलिस ठाणे पुढील तपास करत आहेत

No comments: