ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘ट्विन सिटीचा राजा’चा भव्य गणेशोत्सव
ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटलमध्ये ‘ट्विन सिटीचा राजा’चा भव्य गणेशोत्सव
मयुर कापरे.-----------------
परतवाडा : ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटल, परतवाडा येथे यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तीभावाने आणि सामाजिक सेवेच्या भावनेने साजरा करण्यात येत आहे. १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या गणेशोत्सवात हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
यावेळी हॉस्पिटल परिसरात ‘ट्विन सिटीचा राजा’ गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवातील प्रमुख उपक्रम म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले.
तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारीवर्गासाठी म्युझिकल चेअर, विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, हॉस्पिटल परिवारासह गणेशभक्त सहभागी होणार आहेत.
या गणेशोत्सवाचा उद्देश केवळ धार्मिक उत्सव साजरा करणे नसून ‘सेवा, आरोग्य आणि संस्कार’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा देखील आहे.
हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अश्लेष तिवारी आणि अॅड. वैभव तिवारी यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच समाजसेवा आणि टीममधील एकोपा वाढवण्याची संधी आहे. रुग्णसेवेसोबतच सामाजिक जबाबदारी पार पाडणे ही ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटलची सातत्यपूर्ण प्राथमिकता आहे.
“गणपती बाप्पा मोरया… ट्विन सिटीचा राजा मोरया!” 🙏
ट्विन सिटी हार्ट हॉस्पिटल, परतवाडा
सेवा • आरोग्य • संस्कार

No comments: