कायदा शिक्षण मातृभाषेत व्हावे; कुलगुरू डॉ कामत यांच्याकडे विद्यार्थ्यांची मागणी.
कायदा शिक्षण मातृभाषेत व्हावे; कुलगुरू डॉ कामत यांच्याकडे विद्यार्थ्यांची मागणी.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
शिवाजी विद्यापीठात एलएलएम मराठी भाषेत सुरू करण्याची मागणी.
*कोल्हापूर*: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व विधी महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठातील लॉ डिपार्टमेंटमध्ये एलएलएम अभ्यासक्रम मराठी भाषेत सुरू करावा, अशी मागणी करणारे निवेदन माननीय कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कमलाकर कामत यांना आज देण्यात आले.
ग्रामीण आणि मधल्या वर्गातील विद्यार्थ्यांना कायदेशीर शिक्षण मातृभाषेतून मिळावे, यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. इंग्रजी भाषेमुळे अनेक हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे एलएलएम मराठीतून सुरू केल्यास कायदा क्षेत्रात स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
*या प्रमुख मागण्या करण्यात आल्या:*
1. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून एलएलएम मराठी माध्यमात सुरू करावा.
2. विद्यापीठातील लॉ डिपार्टमेंट आणि संलग्नित सर्व विधी महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावा.
3. मराठी भाषेतील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी तज्ञ समिती स्थापन करावी.
यावेळी कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेतली असून, शैक्षणिक परिषदेत या विषयावर चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
*यावेळी उपस्थित*:
या निवेदनावर *संस्थापक ॲड. अक्षय पाटील, कार्याध्यक्ष राहुल पाटोळे सर्जेराव पाटील* आणि *विद्यार्थी प्रतिनिधी ॲड. दयानंद जाधव* यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी अनेक विधी विद्यार्थी उपस्थित होते.
---

No comments: