Header Ads

अमरावतीत श्री दगडूशेठ गणपतीचे जल्लोषात आगमन; अनंत गणेशोत्सव मंडळात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

अमरावतीत श्री दगडूशेठ गणपतीचे जल्लोषात आगमन; अनंत गणेशोत्सव मंडळात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत.



प्रतिनिधी : पी. एन. देशमुख | अमरावती

अमरावती शहरातील बुधवार रोड परिसरात सार्वजनिक अनंत गणेशोत्सव मंडळात श्री दगडूशेठ गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाले. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि शेकडो महिला-पुरुष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

बुधवार रोडवरील सीताराम बिल्डिंग चौकातून श्री दगडूशेठ गणपतीची मिरवणूक राजकमल चौक, गांधी चौक, अंबा गेट मार्गे मंडळाच्या ठिकाणी दाखल झाली. संपूर्ण परिसर "गणपती बाप्पा मोरया" च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

मंडळात बाप्पाचे आगमन होताच महिला कार्यकर्त्यांनी आरती करून फुलांचा वर्षाव केला. रात्री ८.३० वाजता वैदिक मंत्रोच्चारात श्रींची विधिवत स्थापना करण्यात आली. पंडित शुभम पांडे यांनी पूजा व प्राणप्रतिष्ठेचा विधी संपन्न केला.

स्थापनेनंतर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंडळातर्फे दररोज सकाळी ६.०० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब (पी. एन. देशमुख), संतोषराव अवताडे, गजाननराव काळे, आबाराव मोहोळ, रमेशराव घुमडे, राघव देशमुख, प्रमोदभाऊ इंगोले, मनोजभाऊ मामर्डे, निखिलभाऊ देशमुख, संजयभाऊ बारस्कर, अॅड. काकडे, गजूभाऊ दाभाडे, मनोहरभाऊ चौधरी, संदीप गोरटे, प्रवीणभाऊ भेंडे, अॅड. नितीन माथने, संदीपभाऊ गायकवाड, गौरव कांडलकर, संदीपभाऊ पाटील, नितीन बोबडे, राजन श्रीवास्तव, अमोल कोल्हे, राजू कोल्हे, अमोल गाडगे, प्रसन्न दाभाडे, पार्थ मोहोळ, सोहम गायकवाड, आयुष श्रीवास्तव, प्रसाद काळे यांच्यासह अनेक महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर मंडळातर्फे सर्व कार्यकर्ते आणि भाविकांसाठी महाप्रसाद व स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले. भक्ती, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम अनुभवत अनंत गणेशोत्सव मंडळात श्री दगडूशेठ गणपतीचे आगमन संस्मरणीय ठरले.

No comments:

Powered by Blogger.