Header Ads

सातारा : घरफोडी चोरीचा गुन्हा उघड; ५.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

 सातारा : घरफोडी चोरीचा गुन्हा उघड; ५.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत.


सातारा | दि. ८ ऑक्टोबर २०२६

कोरेगाव तालुक्यातील महादेवनगर येथे झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून, सुमारे ४ तोळे वजनाचा सोन्याचा दागिना, अंदाजे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. ३ ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान महादेवनगर, कोरेगाव येथे घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१७/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित तुषार प्रमोद सुतार (वय ३१, रा. महादेवनगर, कोरेगाव) हा सातारा शहरात आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने घरफोडी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेला ४ तोळे वजनाचा सोन्याचा दागिना हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व कोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल सहभागी अधिकारी व अंमलदारांचे पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केलं 

No comments:

Powered by Blogger.